Monday, December 23, 2024
[aioseo_breadcrumbs]

प्रदर्शित होताच वादाच्या कचाट्यात सापडला ‘पांडू’, ‘या’ कारणामुळे सोनाली कुलकर्णीसह पूर्ण टीमवर गुन्हा दाखल?

झी मराठीवरील लोकप्रिय आणि तुफान गाजणाऱ्या ‘चला हवा येऊ द्या’ या शोमधील सर्वांचाच आवडता अभिनेता आणि विनोदवीर भाऊ कदम (Bhau Kadam)  होय. नाव ऐकूनच चेहऱ्यावर हसू आणणारा भाऊ देखील केवळ त्याच्या मेहनतीच्या जोरावर या क्षेत्रात यशाचा झेंडा गाडून उभा आहे. तो नेहमीच या शोच्या माध्यमातून प्रेक्षकांना खळखळून हसवतो. नुकताच भाऊचा आणि मराठी चित्रपसृष्टीत ‘अप्सरा’ म्हणून ओळखली जाणारी अभिनेत्री सोनाली कुलकर्णीचा (Sonalee Kulkarni) ‘पांडू’ हा मराठी चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. या चित्रपटासंबंधित एक मोठी माहिती समोर आली आहे. ज्यामुळे प्रचंड खळबळ उडाली आहे.

सोनाली आणि भाऊचा ‘पांडू’ चित्रपट प्रदर्शित होताच वादाच्या कचाट्यात सापडला आहे. अशी माहिती समोर आली आहे की, या चित्रपटातील कलाकारांनी कोरोना प्रतिबंधक नियमांचे उल्लंघन केले आहे. याच कारणामुळे आरपीआय एकतावडीचे युवाध्यक्ष भैय्यासाहेब इंदिसे यांनी चित्रपटातील कलाकार आणि आयोजकांविरुद्ध ठाण्यातील वर्तक पोलीस ठाण्यात हे निवेदन जारी केली आहे. (movie pandu rpi demands prosecution pandu actors and organizers violating corona rules)

या चित्रपटाचा पहिला शो विवियाना या मॉलमध्ये झाला असून, तेथे सर्व कलाकारांनी हजेरी लावली होती. त्यावेळी सर्व कलाकार त्यांचा आनंद साजरा करताना दिसले. सर्वजण प्रचंड खुश होते. मात्र, त्यावेळी आनंदाच्या भरात त्यांनी मास्क आणि सुरक्षित अंतर राखले नसून, कोरोना प्रतिबंधक नियमांचे उल्लंघन केल्याचे भैय्यासाहेब इंदिसे यांनी निवेदनात नमूद केले आहे.

त्याचबरोबर त्यांनी अनेक प्रश्न देखील उपस्थित केले आहे. ते म्हणाले की, “सर्वसामान्य लोकांकडून जर या नियमांचे उल्लंघन झाले तर त्यांच्याकडून ५०० रुपये इतका दंड आकाराला जातो. मग सेलिब्रिटींसाठी वेगळा नियम का?” असा संताप व्यक्त करत त्यांनी प्रश्न उपस्थित केले आहेत.

या शो दरम्यान भाऊ कदम, सोनाली कुलकर्णी, हेमांगी कवी, उदय सबनीस, सविता मालपेकर, प्राजक्ता माळी, कुशल बद्रिके, विजू माने यांच्यासह अनेक कलाकार तेथे उपस्थित होते. ‘पांडू’ या चित्रपटाचे लेखक आणि दिग्दर्शक विजू माने हे आहेत. तसेच या चित्रपटातील गाणी अवधूत गुप्तेने गायली आहेत.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हे देखील वाचा