‘बिग बॉस मराठी’च्या (bigg Boss Marathi 3) तिसऱ्या पर्वाची प्रेक्षकांनी अनेक दिवस वाट पाहिली आहे. अखेर २०२१ मध्ये सप्टेंबर महिन्यात बिग बॉस तिसऱ्या पर्वाला सुरुवात झाली. घरात आलेले सगळेच स्पर्धक अतरंगी आहेत. अनेकांना आपण टेलिव्हिजन तसेच चित्रपटात पाहिले आहेत. घरात आलेले सगळे स्पर्धक चांगलेच चर्चेत होते. परंतु यातील एक नाव संपूर्ण महाराष्ट्रात सगळ्यांच्या तोंडावर आहे. तो स्पर्धक म्हणजे विशाल निकम (vishal nikam). विशाल हा बिग बॉसमधील सर्वात चर्चेत असणारा अभिनेता आहे. या शोमध्ये तो त्याच्या वैयक्तिक आयुष्यामुळे खूपच चर्चेत आहे.
शोमध्ये आल्यापासून विशाल एका व्यक्तीचे नाव सातत्याने घेत असतो. ती व्यक्ती म्हणजे सौंदर्या. परंतु, सौंदर्या नक्की कोण आहे? असा प्रश्न अवघ्या महाराष्ट्राला पडला आहे. घरात त्याची आणि सोनाली मैत्री खुलत असताना त्याने खुलासा केला की, “बाहेर सौंदर्या नावाची एक मुलगी आहे जी, माझी वाट बघत आहे. यानंतर सौंदर्या कोण आहे? ती आणि विशाल रिलेशनमध्ये आहेत का? असे अनेक प्रश्न सगळ्यांना पडले आहेत. (People want to know who is saundrya about Vishal nikam)
बिग बॉसच्या घरात नुकतेच फॅमिली विक झाला. यावेळी विशालची आई आणि बहीण त्याला भेटायला आल्या होत्या. यावेळी विशाल खूप भावुक झाला होता. यावेळी त्याची बहीण त्याला सल्ले देत होती. यावेळी विशाल आईला म्हणतो, “ती कशी आहे? तिला एक फोन कर. तू तिच्याशी बोल.”, यावर विशालची आई म्हणते, “अरे सौंदर्याचा फोन आला होता. ती विचारत होती.” त्याची बहिणही तेच म्हणते. त्यावर विशालचा चेहरा खुलतो. मात्र तिच्याबद्दल काहीही सांगण्यापूर्वी विशाल आईला थांबवतो आणि म्हणतो, “तिच्याबद्दल सांगायला अजून वेळ आहे.” त्याच्या या संवादानंतर सगळे विशालप्रेमी सौंदर्याला बघण्यासाठी आणि त्यांच्यातील नाते जाणून घेण्यासाठी उत्सुक आहेत. बिग बॉसच्या घरातून बाहेर गेल्यावर कदाचित विशाल सौंदर्याबाबत सगळी माहिती सांगेल अशी सगळ्यांना आशा आहे.