बॉलिवूड अभिनेत्री कॅटरिना कैफ आणि विकी कौशल (Katrina Kaif Vicky Kaushal) यांच्या लग्नासाठी कुटुंब जयपूरला रवाना झाले आहे. कॅटरिनाची बहीण सोमवारी दुपारी जयपूर विमानतळावर दिसली. तिने निळ्या रंगाची जीन्स आणि चष्मा घातला होता. मीडिया रिपोर्ट्समध्ये असे म्हटले जात आहे की, तिचा पती देखील तिच्यासोबत होता. कॅटरिनाच्या बहिणीला कोणीतरी तिच्या नावाने हाक मारली आणि तिला गाडीत बसवत घेऊन गेले.
माध्यमांतील वृत्तानुसार, कॅटरिनाची बहीण इसाबेल आणि भाऊ सेबॅस्टियन देखील त्यांच्या मुंबईतील घरातून जयपूरला निघताना दिसले आहेत. सेबॅस्टियनने कुर्ता परिधान केला होता, तर इसाबेल पांढऱ्या टॉपमध्ये मागच्या सीटवर बसलेली दिसली. या रॉयल वेडिंगसाठी कुटुंबासोबत कॅटरिनाचे जवळचे मित्रही जयपूरला पोहोचले आहेत. कॅटरिना कैफच्या अनेक मैत्रिणी जयपूरमध्ये स्पॉट झाल्या आहेत.
दोन वेगवेगळ्या रितीरिवाजानुसार होणार लग्न
मिळालेल्या माहितीनुसार, कॅटरिना आणि विकी हिंदू रितीरिवाजानुसार पहिले लग्न करणार आहेत. यानंतर ख्रिश्चन रितीरिवाजानुसार लग्न होणार आहे. या दोन्ही विवाहांसाठी वेगवेगळ्या पद्धतीने लग्नमंडप तयार करण्यात आला आहे. हे काही पहिले जोडपे नाही जे दोन वेगवेगळ्या रितीरिवाजानुसार लग्न करणार आहेत. याआधीही असे अनेक स्टार्स होते ज्यांनी वेगवेगळ्या रितीरिवाजांचा अवलंब करून एकत्र येऊन लग्नात करोडो रुपये खर्च केले होते.
१४ व्या शतकातील किल्ला
रणथंबोरचा बरवारा किल्ला जयपूरपासून २.५ तासांवर १४ व्या शतकात बांधला गेला. हा किल्ला पूर्वी बरवराचे सरपंच भगवती सिंग यांच्याकडे होता. पुढे हा किल्ला ऑस्मॉस कंपनीला विकण्यात आला. त्यानंतर किल्ल्याचे भव्य हॉटेलमध्ये रूपांतर झाले. हे हॉटेल सिक्स सेन्सेस ग्रुपला भाडेतत्त्वावर देण्यात आले आहे. या किल्ल्यामध्ये दोन राजवाडे आणि दोन भव्य मंदिरे आहेत. येथे कॅटरिना आणि विकीचा विवाह सोहळा पार पडणार आहे.
‘या’ सुविधा आहेत उपलब्ध
या ७०० वर्ष जुन्या राजपुताना शैलीच्या पॅलेसमध्ये आलिशान सूट आहेत. हे सुइट्स समकालीन राजस्थानी शैलीवर बांधलेले आहेत. रिसॉर्टमध्ये बार आणि लाउंजसह तीन रेस्टॉरंट्स, एक स्पा आणि फिटनेस सेंटर तसेच दोन स्विमिंग पूल आहेत. किल्ल्यामध्ये खूप सोयीसुविधा आहेत, त्यामुळे येथून तलावाचे सुंदर दृश्य देखील दिसते.
एक दिवसाचे भाडे
या हॉटेलमध्ये सामान्य खोलीत राहण्यासाठी एका रात्रीसाठी ७७,००० रुपये आणि करांसह सुमारे ९०,००० रुपये खर्च येतो. विशेष सुएटसाठी ४ लाख ९४ हजार रुपये खर्च येणार आहे.