सध्या सर्वत्र लग्न सराईचा सिझन सुरू असून, बॉलिवूडपासून ते टीव्हीपर्यंत अनेक कलाकार विवाहबंधनात अडकत आहेत. यापैकी अंकिता लोखंडे (Ankita Lokhande) ही प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्री आहे. जिने ‘पवित्र रिश्ता’ या मालिकेतून अर्चनाच्या नावाने प्रेक्षकांच्या हृदयात स्थान निर्माण केले आहे. अंकिता केवळ तिच्या सौंदर्य, फिटनेससाठीच नाही, तर ती तिच्या अभिनय आणि वैयक्तिक आयुष्यासाठी देखील चर्चेत असते. ‘पवित्र रिश्ता’ची फेम अभिनेत्री आणि टीव्हीची आवडती सून म्हणून घराघरात नाव कमावणारी अंकिता आता लवकरच विकी जैन (Vicky Jain) याच्यासोबत लग्नगाठ बांधणार आहे. अशा परिस्थितीत चाहत्यांना त्यांच्या लग्नाशी संबंधित प्रत्येक माहितीबद्दल उत्सुकता आहे. अंकिताने तिच्या लग्नाच्या कार्यक्रमातील सुंदर आठवणी सोशल मीडियावर शेअर केल्या आहेत.
व्हिडिओमध्ये अंकिता अगदी साध्या मराठी लूकमध्ये दिसत आहे. तिने गळ्यात सोनेरी आणि लाल रंगाचा मोत्याचा हार घातला आहे आणि फिकट हिरव्या रंगाची बॉर्डर साडी नेसली आहे. तर त्यासोबत पारंपरिक मराठी नथ घातली आहे. अंकिताने हातात हिरव्या बांगड्या घातल्या असून, या मराठी लूकमध्ये ती खूपच सुंदर दिसत आहे. व्हिडिओमध्ये अंकिता तिचा होणारा पती विकीसोबत पूजा करताना दिसत आहे. या सोहळ्यात त्यांचे कुटुंबीय उपस्थित होते.
https://www.facebook.com/watch/?v=445790497172820
अंकिता सोशल मीडियावरही खूप सक्रिय आहे आणि तिच्या चाहत्यांना फोटो आणि व्हिडिओच्या माध्यमातून अपडेट करत असते. अलिकडेच अंकिताने तिच्या अधिकृत इंस्टाग्राम अकाऊंटवरून विवाहपूर्व सेलिब्रेशनचे अनेक फोटो शेअर केले होते. ज्यामध्ये तिचा आनंद स्पष्टपणे पाहायला मिळला होता. त्याचवेळी त्यांच्या लग्नाच्या पत्रिकेचा व्हिडिओ इंटरनेटवर पसरला होता. व्हिडिओ पाहिल्यावर लक्षात येते की, या जोडप्याने पत्रिका तयार करण्यासाठी खूप खर्च केला होता.
त्याचबरोबर विवाहपूर्व सोहळ्यात अंकिता आणि विकी पारंपरिक पोशाखात दिसले होते. ज्याचे फोटो देखील सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. फोटोमध्ये अंकिता हिरव्या आणि गुलाबी रंगाची साडी नेसलेली दिसत होती. विकीने पांढऱ्या रंगाचा कुर्ता पायजमा घातला होता. फोटोत हे जोडपे मुंडावळ्या बांधलेले दिसले होते, जे लग्नाच्या दिवशी बांधण्याची प्रथा आहे.
हेही नक्की वाचा-
-असे काय झाले की, महिला स्पर्धकासमोर रणवीर सिंगला झुकवावे लागले डोके? व्हिडिओ जोरदार व्हायरल-काय बिनसलं! सारा अली खान आणि ‘बिग बॉस १५’च्या स्पर्धकामध्ये घडले ‘असे’ काही, अभिनेत्रीनेही चांगलेच सुनावले-‘या’मुळे कुमार सानू यांनी घेतला अनु मलिकचा बदला, ‘सा रे गा मा पा’मध्ये सांगितले कारण