कॅटरिना कैफ (Katrina Kaif) आणि विकी कौशल (Vicky Kaushal) ९ डिसेंबरला लग्नबंधनात अडकणार आहेत. अशा परिस्थितीत, या लग्नात बॉलिवूडच्या जवळच्या मित्रांसह, काही व्हीआयपी पाहुण्यांचा सहभाग असल्याची बातमी समोर आली आहे. कॅटरिना आणि विकीचा विवाह (Katrina and Vicky wedding) राजस्थानचा ७०० वर्ष जुना किल्ला, सिक्स सेन्सेस फोर्टमध्ये पूर्ण विधींसह पार पडणार आहे. माध्यमातील वृत्तानुसार, त्यांच्या लग्नात केवळ १२० लोक सहभागी होणार आहेत.
‘ही’ आहे कॅटरिना आणि विकीच्या लग्नातील पाहुण्यांची यादी
कॅटरिना आणि विकीच्या शाही लग्नाला फक्त जवळचे मित्र आणि कुटुंबातील सदस्य उपस्थित राहणार आहेत. माध्यमातील वृत्तानुसार, या दोघांच्या लग्नाला बॉलिवूडचे अनेक मोठे स्टार्स हजेरी लावणार आहेत. त्यांच्या गेस्ट लिस्टमध्ये आलिया भट्ट, करण जोहर, सलमान खान, बॉस्को मार्टिस, कबीर खान यांच्यासह अनेकांना आमंत्रित करण्यात आले आहे. यासोबतच कॅटरिनाच्या लग्नाला सलमान खानच्या कुटुंबातील अनेक सदस्यही उपस्थित राहणार आहेत. (katrina kaif vicky kaushal wedding guest list)
अर्पिता- अलवीरा बनणार खास पाहुणे
कॅटरिना कैफ खान कुटुंबाच्या किती जवळची आहे, हे सर्वांनाच माहीत आहे. सलमान खान हा कॅटरिनाचा चांगला मित्र आणि जवळच्या लोकांमध्ये आहे, तर सलमान खानची बहीण अलवीरा अग्निहोत्री आणि अर्पिता खानही अभिनेत्रीच्या खूप जवळ आहेत. अलवीरा आणि कॅटरिना खूप दिवसांपासून चांगल्या मैत्रिणी आहेत. त्यामुळे अर्पिता आणि अलवीरा दोघीही कॅटरिनाच्या लग्नाला उपस्थित राहतील, असे म्हटले जात आहे.
‘या’ कारणामुळे सलमान नसणार उपस्थित
सलमान आणि कॅटरिना किती जवळ आहेत, याचा पुरावा त्यांनी वेळोवेळी दिला असला, तरी अभिनेत्रीच्या लग्नात सलमान सहभागी होणार नाही. माध्यमातील वृत्तानुसार, कॅटरिनाने सलमान खानला तिच्या लग्नासाठी खास निमंत्रणही दिले होते. पण सलमान खान त्याच्या कामाच्या कमिटमेंटमुळे लग्नाला उपस्थित राहू शकणार नाही.
हेही नक्की वाचा –