‘माझी तुझी रेशीमगाठ’ ही मालिका सध्या प्रेक्षकांना खास पसंत पडत आहे. मालिकेची कहाणी काहीशी वेगळी असल्याने मालिकेला खूप चांगला प्रतिसाद मिळत आहे. मालिकेत प्रार्थना बेहेरे आणि श्रेयस तळपदे मुख्य भूमिकेत असून, यासोबतच बालकलाकार मायरा वैकुळने देखील सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. मालिकेने अल्पावधीत प्रेक्षकांचे खूप प्रेम मिळवले. मालिकेत जुने आणि गाजलेले कलाकार काम करत असल्याने मालिकेला खूप चांगला टीआरपी सुद्धा मिळत आहे. मालिकेत प्रार्थना बेहेरे नेहा हे पात्र निभावत आहे. अशातच प्रार्थनाचे काही सुंदर फोटो समोर आले आहेत.
प्रार्थनाने तिच्या अधिकृत इंस्टाग्राम अकाऊंटवरून तिचे काही फोटो शेअर केले आहेत. या फोटोमध्ये आपण पाहू शकतो की, तिने सुंदर असा फ्रिलचा गुलाबी रंगाचा ड्रेस परिधान केला आहे. यासोबत तिने गळ्यात मोत्यांची माळ घालून केस रिकामे सोडले आहेत. या ड्रेसमध्ये तिचे सौंदर्य खुलून आले आहे. या फोटोमध्ये ती वेगवेगळ्या पोझ देताना दिसत आहे. (Prarthana behere’s photo viral on social media)
तिच्या अनेक चाहत्यांना हे फोटो खूप आवडले असून, तिच्या या फोटोला एक लाखापेक्षाही जास्त लाईक्स आले आहेत. तसेच सोनाली कुलकर्णी आणि माधव देवचक्के यांनी या फोटोवर कमेंट करून तिचे कौतुक केले आहे. तसेच तिचे अनेक चाहते देखील या फोटोवर त्यांच्या प्रतिक्रिया देत आहेत.
प्रार्थना ही एक लोकप्रिय अभिनेत्री आहे. मराठी अभिनेत्री सृष्टीमध्ये तिची एक झलक बघण्यासाठी प्रेक्षक उतावळे झालेले असतात. तिने याआधी ‘मितवा’, ‘कॉफी आणि बरंच काही’, ‘व्हॉटसऍप लग्न’, ‘ती आणि ती’, ‘मस्का’, ‘फुगे’, ‘लग्न मुबारक’, ‘लव्ह यू जिंदगी’ यांसारख्या चित्रपटात काम केले आहे. तसेच तिने झी मराठीवरील ‘पवित्र रिश्ता’ या मलिकेत देखील काम केले आहे. या मालिकेत तिने अंकिता लोखंडे हिच्या लहान बहिणीच्या पात्र निभावले होते.
हेही वाचा-
रस्त्यावर लोकांना थांबवून थांबवून फुलं देताना दिसला कार्तिक आर्यन, पण काय आहे कारण?
BIGG BOSS 15: राखी सावंतच्या पतीने केला मोठा खुलासा, स्वतः च्या भूतकाळाबद्दल सांगितले ‘असे’ काही