×

भोजपुरी सुपरस्टार पवनसिंगच्या आगामी गाण्याच्या टिझरचा सोशल मीडियावर धुमाकूळ, काही काळातच टिझर ट्रेंडिंगमध्ये

भोजपुरी सिनेमातील रेकॉर्ड बनवणारा अभिनेता आणि मशीन पॉवर अशी ओळख असलेल्या पवन सिंग याने त्याच्या चाहत्यांसाठी एक नवीन धमाकेदार गाणे आणले असून, त्याने त्याच्या सोशल मीडिया अकाऊंटवर याबद्दल माहिती दिली. पवनसिंगने नुकताच त्याच्या इन्स्टाग्रामवर एक व्हिडिओ शेअर केला असून, या व्हिडिओमध्ये तो अभिनेत्री सौंदर्या शर्मा आणि लेखा प्रजापती सोबत दिसत आहे. हा टिझर पवन सिंगच्या आगामी म्युझिक अल्बमचा असून, हा टिझरपाहून त्याच्या चाहत्यांमध्ये गाण्याबद्दल खूप उत्साह वाढला आहे. ‘लोलिपॅाप लागेलू’ फेम गायकाच्या नवीन गाण्याचे बोल आहेत, ‘तुमसा कोई प्यारा’. हे गाणे लवकरच प्रदर्शित केले जाणार आहेत.

पवन सिंगने इंस्टाग्रामवर गाण्यांचा टिझर शेअर करत आणि लिहिले, “नवीन अंदाजामध्ये घेऊन येणार आहे धमाकेदार गाणं ‘तुमसा कोई प्यारा..'” या गाण्याचा टिझर भोजपुरी गाणे टिप्स या अधिकृत युट्युब चॅनेलवर प्रदर्शित करण्यात आला आहे. या गाण्याचा टिझरला २ लाखाहून अधिक प्रेक्षकांनी बघितले असून, कमेंटमध्ये अनेक चाहत्यांनी या गाण्याविषयी काही प्रश्न विचारले आहेत. टिझर प्रदर्शित झाल्यानंतर काही काळातच ट्रेंडिंगला आला आहे. या गाण्यांमध्ये पवन सिंग यांच्यासोबत सौंदर्या शर्मा आणि लेखा प्रजापती देखील दिसत आहेत.

View this post on Instagram

A post shared by Pawan Singh (@singhpawan999)

टिझर पाहून हा अंदाज लावणे कठीण नाही की, पवनसिंगचे हे गाणे इंटरनेटवर धमाल करणार.  टिझरमध्ये पवनसिंग लक्षवेधक पद्धतीने दुचाकीवर बसून दमदारपणे एन्ट्री घेतो आणि त्याची गर्लफ्रेंड असलेल्या लेखा प्रजापतीला मिठी मारतो. हे दृश्य सौंदर्या शर्मा बघते आणि त्यानंतर ती जो लूक देतो तो पाहण्यासारखा आहे. पवन सिंग स्वतः च्या नवीन गाण्यावर चाहत्यांच्या प्रतिक्रियेची उत्सुकतेने वाट पाहत आहेत.

हे गाणे प्रियांका सिंगसोबत मिळून पवनसिंगने गायिले आहे. ‘तुमचा कोई प्यारा’ गाण्याचे शब्द रोशन सिंग विश्वास यांनी लिहिले असून, संगीत प्रियांशू सिंग यांनी दिले आहे. तर या मूळ गाण्याचे गीतकार राहत इंदोरी आणि संगीतकार अनू मलिक होते तर कुमार सानू आणि अलका याग्निक यांनी हे गाणे गायले होते.

हेही नक्की वाचा –

Latest Post