अंकिता आणि विकीच्या लग्नाचे फंक्शन सुरू झाले आहे. दोघेही या फंक्शन्सचा खूप आनंद घेत आहेत. हे जोडपे १४ डिसेंबरला लग्न बंधनात अडकणार आहेत. रविवारी (१२ डिसेंबर) दोघांचा साखरपुडा मोठ्या थाटात पार पडला. ज्यामध्ये इंडस्ट्रीतील अनेक कलाकार सहभागी झाले होते.
अंकिता आणि विकीच्या साखरपुड्याचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. या व्हिडिओ आणि फोटोवरूनच हे फंक्शन किती ग्रँड झाले असेल याचा अंदाज लावता येऊ शकतो. अंकिता आणि विकी त्यांच्या साखरपुड्याच्या कार्यक्रमात अतिशय आकर्षक दिसत आहे. या फंक्शनमध्ये अंकिताने विकीसाठी विशेष एक परफॉर्मन्स देखील दिला. सोबतच दोघांनी एकमेकांसाठी त्यांचे प्रेम देखील खास शब्द व्यक्त केले.
साखरपुड्यामध्ये अंकिताने राखाडी रंगाचा लांब आकर्षक ड्रेस परिधान केला होता, ज्यामध्ये ती खूपच सुंदर दिसत होती. तर दुसरीकडे, विकीने राखाडी रंगाच्या ब्लेझरसह काळ्या रंगाचा आऊटफिट घातला होता. ही जोडी या कपड्यांमध्ये एकमेकांना कॉम्प्लिमेंट करताना दिसत होती.
रविवारी (१२ डिसेंबर) ला अंकिता आणि विकीचे मेहंदी फंक्शन होते. जे अतिशय खास पद्धतीने साजरे करण्यात आले. मेहंदी सोहळ्यात दोघांनी जबरदस्त डान्स केला. इतकेच नाही, तर अंकिताला उचलून घेत विकीने डान्स केला. ज्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. अंकिताने मेंदीच्या फंक्शनची काही झलकही चाहत्यांना दाखवली. फोटो शेअर करताना तिने लिहिले की, “जे प्रेम आम्ही शेअर करतो त्यामुळे माझी मेहंदी अधिकच सुंदर झाली आहे.”
कुटुंबासह अंकिताच्या मित्रमैत्रिणींनीही मेहंदी फंक्शनला हजेरी लावली होती. ज्यामध्ये सृष्टी रोडे, माही विज, अपर्णा दीक्षित, अमृता खानविलकर, विकास गुप्ता, दिगांगना यांच्यासह अनेक कलाकार उपस्थित होते.
अंकिता तिच्या फंक्शनमध्ये पायावर पट्टी बांधून डान्स करत आहे. डान्स रिहर्सल करताना अंकिताच्या पायाला दुखापत झाली, त्यानंतर तिला तात्काळ हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले. डॉक्टरांनी तिला काही काळ बेड रेस्टचा सल्ला दिला होता.
हेही वाचा-
Video: माधुरी दीक्षितने ‘लेझी लॅड’ गाण्यावर दाखवले भन्नाट मूव्ह्ज, एक्सप्रेशन्सही आहेत कमाल!
कधी वाळवंट, तर कधी समुद्रामध्ये रोमान्स करताना दिसली अंकिता; रोमँटिक प्री-वेडिंग शूट आले समोर
दोन हजार रुपयांपासून कमाईला सुरुवात करणारे रजनीकांत आज आहेत ‘इतक्या’ कोटींचे मालक