Video: माधुरी दीक्षितने ‘लेझी लॅड’ गाण्यावर दाखवले भन्नाट मूव्ह्ज, एक्सप्रेशन्सही आहेत कमाल!


बॉलिवूडची धक धक गर्ल माधुरी दीक्षित (Madhuri Dixit) हिच्या अदांचे आणि सुंदरतेचे सर्वच दिवाने आहेत. अभिनेत्रीच्या सौंदर्याचे जितके कौतुक करावे, तितके कमी आहे. जेव्हा जेव्हा नृत्याविषयी बोलले जाते, तेव्हा सगळ्यांच्या डोळ्यासमोर माधुरी दीक्षितचे नाव येते. माधुरी दीक्षितने तिच्या नृत्याने आणि अदाकारीने प्रेक्षकांच्या हृदयात खास स्थान निर्माण केले आहे. तसेच सोशल मीडियावर माधुरी दीक्षितच्या नृत्याचे देखील लाखो चाहते आहेत. पुन्हा एकदा माधुरी दीक्षितने आपल्या डान्सिंगच्या टॅलेंटने सर्वांचे लक्ष वेधले आहे.

माधुरी दीक्षितने केला व्हिडिओ शेअर
माधुरी दीक्षित नेहमी चाहत्यांसाठी वेगवेगळे फोटो आणि व्हिडिओ शेअर करत असते. हे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर खूप व्हायरल देखील होतात. अभिनेत्रीने अलिकडेच तिच्या इंस्टाग्राम अकाउंटवर एक डान्स व्हिडिओ शेअर केला आहे, ज्याच्यामध्ये ती फुलऑन मस्तीच्या मूडमध्ये दिसत आहे. (madhuri dixit made weekend a fun day danced to the song lazy lad)

व्हिडिओच्या सुरूवातीला माधुरी सोफ्यावर झोपलेली असते. त्यानंतर ‘घनचक्कर’ चित्रपटातील ‘लेझी लॅड’ हे गाणे वाजते. या गाण्यावर माधुरी खूप छान डान्स करू लागते. नेहमीप्रमाणेच यातही माधुरी दीक्षितने अतिशय जबरदस्त डान्स केला आहे. या व्हिडिओमध्ये तिचा डान्स आणि अदाकारी ही आकर्षक वाटत आहे.

माधुरीच्या लुक विषयी बोलायचे झाले, तर या व्हिडिओमध्ये तिने फिकट निळ्या रंगाचा ट्रॅक सूट घातला आहे. यासोबत तिने स्पोर्ट शूज देखील घातले आहेत.

माधुरी दीक्षितने हा व्हिडिओ शेअर करत कॅप्शनमध्ये ‘वीकेंड वाइब्स’ असे लिहिले आहे. नेहमीप्रमाणेच या व्हिडिओवर चाहत्यांनी भरभरून प्रेम दिले आहे. माधुरीच्या एका चाहत्याने कमेंटमध्ये ‘सुपर से भी ऊपर’ असे लिहिले आहे. तर दुसऱ्याने ‘झक्कास’ असे लिहिले आहे. अनेकांनी माधुरीच्या डान्सचे कौतुक केले आहे.

हेही वाचा-


Latest Post

error: Content is protected !!