मनोरंजनविश्वात कास्टिंग काऊच हा शब्द आत खूपच सामान्य झाला आहे. अभिनेत्रींना कधी कधी तर अभिनेत्यांना देखील काम मिळवण्यासाठी कास्टिंग काऊचचा सामना करावा लागतो. याबद्दल पूर्वी खूप कमी चर्चा व्हायची किंवा पूर्वी कलाकार याबद्दल सार्वजनिक ठिकाणी, मीडियासमोर बोलण्यास टाळाटाळ करायचे मात्र मागील काही वर्षांपासून काही कलाकार अगदी बेधडकपणे त्यांना आलेले कास्टिंग काऊचचे अनुभव सर्वांना सांगतात. कास्टिंग काऊचबद्दल बिनधास्त बोलणारी अभिनेत्री म्हणजे सुरवीन चावला. सुरवीनने एका मुलाखतीमध्ये तिला दाक्षिणात्य इंडस्ट्रीमध्ये आलेल्या कास्टिंग काऊचबद्दल सांगितले आहे.
सुरवीनला दाक्षिणात्य इंडस्ट्रीमध्ये कास्टिंग काऊचचा सामना करावा लागला होता. पहिल्याच मुलाखतीमध्ये तिला बॉडी शेम केले गेले. तिला एवढे पण सांगितले गेले की, वजनामुळे तिला साऊथमध्ये काम मिळणार नाही. सुरवीनने मुलाखतीमध्ये सांगितले की, “हा, जेव्हा मी टीव्हीवर काम करत होते आणि त्यानंतर मी माझ्या पहिल्या सिनेमाच्या मीटिंगसाठी गेले होते, तेव्हा मला बॉडी शेमिंगचा सामना करावा लागला. इंडस्ट्रीतल्या अनेक अभिनेत्रींसोबत हे असे घडते. त्यांच्या दिसण्यावर प्रश्न उठवले जातात, त्यांच्या वजनावर प्रश्न विचारले जातात आणि त्यांच्या शरीराच्या साईजवर देखील प्रश्न विचारले जातात. या क्षेत्रात राहण्याच्या काय मर्यादा आहेत? माझ्यासाठी हा असा काळ होता जेव्हा मी कास्टिंग काऊचचा सामना करत होती. बॉलिवूडसोबतच दाक्षिणात्य इंडस्ट्रीमध्ये देखील मला हे सहन करावे लागले. हा काळ माझ्यासाठी खूपच कठीण होता.”
सुरवीनला एक बोल्ड अभिनेत्री म्हणून ओळखले जाते. तिने तिच्या करिअरची सुरुवात टेलिव्हिजनपासून केली. तिने ‘कही तो होगा’, ‘कसोटी जिंदगी की’, ‘काजल’ आदी मालिकांमध्ये काम केले. त्यानंतर तिने तिचा मोर्चा चित्रपटांकडे वळवला. तिने कन्नड सिनेमा ‘परमेशा पानवाला’मध्ये काम केले. त्यानंतर ती ‘हेट स्टोरी २’, ‘अग्ली’, ‘पार्च्ड’ आदी चित्रपटांमध्ये झळकली. हेट स्टोरी २ सिनेमाने तिला खरी ओळख दिली. या चित्रपटातील तिच्या बोल्ड सीन्सकडे सगळीकडे एकच गोंधळ घातला होता. याशिवाय सुरवीन ‘हक से’ आणि ‘सेक्रेड गेम्स’ या वेबसिरीजमध्ये देखील दिसली.
हेही वाचा :
बॉलिवूडमध्ये पदार्पण करण्याआधी करत होता ऍड एजेन्सीमध्ये काम, जाणून घ्या जॉन अब्राहमचा पहिला पगार










