बॉलिवूडमध्ये पदार्पण करण्याआधी करत होता ऍड एजेन्सीमध्ये काम, जाणून घ्या जॉन अब्राहमचा पहिला पगार


बॉलिवूडमधील हँडसम अभिनेता जॉन अब्राहम (John Abraham) याची ओळख आज सर्वत्र आहे. मॉडेलिंगपासून करिअरला सुरुवात केलेला हा अभिनेता आज एक लोकप्रिय अभिनेता आहे. चित्रपटसृष्टीची कोणतीही पार्श्वभूमी नसलेल्या या अभिनेत्याने आज त्याच्या टॅलेंटच्या बळावर त्याचे नाव कमावले आहे. अशातच जॉन शुक्रवारी (१७ डिसेंबर) त्याचा वाढदिवस साजरा करत आहे. चला तर यानिमित्त जाणून घेऊया या क्षेत्रात येण्याचा त्याचा प्रवास कसा आहे आणि त्याने नेमकी कुठून सुरुवात केली.

जॉन अब्राहमचा जन्म १७ डिसेंबर १९७२ मध्ये केरळ येथे झाला. त्याची आई पारशी आणि वडील मल्याळम आहेत. अभिनेत्याचे पारसी नाव फरहान असे आहे, परंतु चित्रपटात आल्यानंतर त्याच्या वडिलांनी त्याचे नाव बदलून जॉन असे ठेवले. त्याने त्याच्या करिअरची सुरुवात मॉडेलिंगपासून केली होती. चित्रपटात आणि मॉडेलिंगमध्ये पदार्पण करण्याआधी जॉन एका ऍड एजेन्सीमध्ये काम करत होता. त्यावेळेची त्याचा पगार १३,८०० रुपये एवढा होता. तो अनेक म्युझिक व्हिडिओमध्ये देखील दिसला आहे. (John abraham celebrate his birthday, let’s know about career)

मॉडेलिंग करता करता त्याने नाव कमावले. त्यावेळी त्याची भेट निर्माता आणि दिग्दर्शक महेश भट्ट यांच्यासोबत झाली. त्यांनी त्याला चित्रपटात काम करण्याची ऑफर मिळाली. त्याने ‘जिस्म’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. या चित्रपटात त्याच्यासोबत बिपाशा बसू मुख्य भूमिकेत होती. या चित्रपटात त्याला काम मिळण्यामागे एक किस्सा आहे. चला तर जाणून घेऊया तो किस्सा.

महेश भट्ट यांना त्यांच्या ‘जिस्म’ या चित्रपटासाठी एका नवीन चेहऱ्याची गरज होती, ज्याची पर्सनॅलिटी संजय दत्तसारखी असावी असे त्यांना वाटत होते. एके दिवशी महेश भट्ट यांनी जॉनला मॉडेलिंग करताना पाहिले. त्यांनी अभिनेत्याला सांगितले की, त्यांना संजय दत्तसारख्या कलाकाराची गरज आहे. त्यांनी हे देखील सांगितले की, ते जो चित्रपट जाणार आहेत, तो प्रेक्षकांना आवडेल की नाही हे पूर्णतः त्यांच्यावर अवलंबून असणार आहे.

त्यांचे हे बोलणे ऐकून त्याने चित्रपटात काम करण्यास होकार दिला. हा चित्रपट २००३ मध्ये प्रदर्शित झाला होता. चित्रपटातील त्याची आणि बिपाशा बसूची केमिस्ट्री सगळ्यांना खूप आवडली होती. चित्रपटाने त्याला चांगली ओळख निर्माण करून दिली. यानंतर त्याने कधीच मागे वळून पाहिले आहे. यानंतर त्याला अनेक चित्रपटाच्या ऑफर आल्या. त्याने ‘साया’, ‘एतबार’, ‘लकीर’ यांसारख्या चित्रपटात काम केले. परंतु त्याला खरी ओळख यश चोप्रा यांच्या ‘धूम’ या चित्रपटातून मिळाली.

धूम’ या चित्रपटातील जॉन अब्राहमने चोराच्या भूमिकेतून प्रेक्षकांचे मन जिंकले. यानंतर त्याने ‘काल’, ‘वाटर’, ‘गरम मसाला’, ‘टॅक्शी नंबर ९२११’, ‘दोस्ताना’, ‘ न्यूयार्क’, ‘मद्रास कॅफे’, ‘सत्यमेव जयते’ आणि ‘मुंबई सागा’ यांसारख्या सुपरहिट चित्रपटात काम केले.

चित्रपटासोबत जॉन त्याच्या वैयक्तिक आयुष्यामुळे खूप चर्चेत होता. त्याचे नाव अभिनेत्री बिपाशा बसूसोबत जोडले गेले होते. त्या दोघांनी अनेक वर्ष एकमेकांना डेट केले आहे. ते ९ वर्ष रिलेशनमध्ये होते. परंतु काही वैयक्तिक मतभेदामुळे त्यांचे ब्रेकअप झाले.

जॉनचे लग्न ३ जानेवारी २०१४ मध्ये इन्व्हेस्टर आणि बँकर प्रिया रुचलसोबत झाले. त्याने एकदा त्याच्या मुलाखतीत त्याच्या पत्नीबाबत सांगितले होते की, “प्रिया एक इन्व्हेस्टर आणि बँकर आहे आणि ती पॅपराजींची पर्वा करत नाही. प्रियाने लंडनमध्ये तिचे शिक्षण पूर्ण केले आहे. ती लॉस एंजेलिसमध्ये देखील राहिली आहे. ती खूपच शांत आहे आणि तिची हीच सवय मला खूप आवडते.”

जॉनला गाड्यांची खूप आवड आहे. त्याच्याकडे लाखो रुपयांच्या बाईक आहेत. त्याच्याकडे बीएमडब्ल्यू, होंडा, सीबीआर, अप्रिलिया, यामाहा, एमव्ही अगस्ता आणि डुकाटी यांसारख्या कंपनीच्या बाईक आहेत. तो अगदी फिटनेस फ्रिक आहे. ती स्मोकिंग आणि अल्कोहोलचे सेवन करत नाही. तसेच बॉलिवूडमधील कोणत्याच पार्टीत तो सहभागी होत नाही. तो ऍनिमल लव्हर आहे. अनेक सामाजिक मुद्यांवर देखील तो त्याचे मत मांडत असतो.

हेही वाचा :

Suresh Oberoi Birthday | अवघे ५०० रुपये देखील नव्हते खिशात, जेव्हा मुंबईत पाऊल टाकले; आज आहेत करोडपती

Shriram Lagoo Death Anniversary | आठवण नटसम्राटाची, श्रीराम लागू यांच्या आयुष्यातील हे किस्से तुम्हाला नक्की ठाऊक नसतील

HBD Riteish Deshmukh | दोघांमध्ये प्रेम नक्की कधी फुलले, हे आजही त्यांना सांगता येत नाही; रितेश भैय्या आणि जेनेलियाची लव्हस्टोरी

 


Latest Post

error: Content is protected !!