World’s Most Admired Men 2021 | टॉप २०मध्ये ५ भारतीय, ‘किंग खान’ १४व्या क्रमांकावर; पंतप्रधान मोदींचा नंबर घसरला


जगातील सर्वात प्रशंसनीय पुरुष कोण, महिला कोण या प्रश्नाचं उत्तर आता मिळाले आहे. याचे कारण, ‘YouGov’ ने ‘वर्ल्ड मोस्ट एडमायर्ड मेन आणि वुमेन २०२१’ ची एक यादी जाहीर केली आहे. यातील ‘जगातील सर्वात प्रशंसनीय पुरुष  २०२१’ या यादीत टॉप २०मध्ये पाच भारतीयांनी स्थान मिळवले आहे.

या यादीत अनेक दिग्गज व्यक्तींच्या नावाचा समावेश आहे. यादीतील वीस व्यक्तींमध्ये असलेल्या एकूण भारतीयांत देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी, सचिन तेंडुलकर, शाहरुख खान, अमिताभ बच्चन, विराट कोहली यांचा समावेश आहे.

 

प्रशंसनीय पुरुषांच्या यादीत स्थान मिळवण्यासाठी मोठी चुरस झाल्याचे पाहायला मिळाले. त्यातही देशातील 5 व्यक्तींमध्येही चांगलीच चुरस झाल्याचे दिसते. याचे कारण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा क्रमांक घसरुन 8 वर गेला आहे. ते मागील वेळी 4थ्या क्रमांकावर होते. तर क्रिकेटपटू सचिन तेंडूलकर (12), शाहरूख खान (14) अभिनेता अमिताभ बच्चन (15) तर विराट कोहली (18) क्रमांकावर आहे.

‘YouGov’ नक्की काय आहे याबद्दल आपण जाणून घेऊया 

‘YouGov’ ही एक ब्रिटीश आंतरराष्ट्रीय संस्था आहे. ही संस्था इंटरनेटवर आधारित मार्केट रिसर्च आणि डेटा विश्लेषणाच्या आधारावर काम करते. या संस्थेचे मुख्यालय यूनायटेड किंगडममध्ये आहे. माध्यमांच्या वृत्तांनुसार या संस्थेने ३८ देशांमधील ४२ हजारांहून अधिक लोकांचा अभ्यास केला आहे. या अभ्यासानंतर त्यांनी २०२१ मधील कौतुकास्पद पुरूषांची यादी तयार केली आहे.

भारतरत्न पुरस्कार प्राप्त केलेल्या आणि क्रिकेट विश्वात इतिहास रचणाऱ्या सचिन तेंडूलकरचे नावही या यादीत आहे. तसेच भारतीय कसोटी क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहली देखील सध्या चर्चेत आहे. याबरोबरच क्रिकेटमधील त्याच्या कामगिरीमुळे त्याचा चाहतावर्गही मोठा आहे.

मनोरंजन विश्वात स्वत:च स्थान निर्माण करणाऱ्या शाहरूख खानचे फारसे चित्रपट या वर्षात प्रदर्शित झाले नाहीत. परंतु त्याच्या चाहत्यांमुळे तो या यादीत आहे असे म्हणायला फरकत नाही. दुसरीकडे मात्र ७९ वर्षांचे बिग बी यांचा अभिनय आजही लहानांपासून वयोवृद्ध लोकांपर्यंत सर्वांना खिळवत ठेवतो. त्यांच्या ‘कौन बनेगा करोडपती’ या कार्यक्रमाचे १००० एपिसोड पुर्ण झाले आहेत. दरम्यान त्यांच्या नवीन प्रदर्शित होणाऱ्या ‘पुष्पा’ या चित्रपटामुळे ते चर्चेत आहेत.

हेही वाचा-


Latest Post

error: Content is protected !!