‘बिग बॉस मराठी‘चे तिसरे पर्व संपण्यास आता केवळ काहीच दिवस शिल्लक राहिले आहेत. घरात सात स्पर्धक शिल्लक आहेत. त्यामुळे त्यांच्यामध्ये बिग बॉसची ट्रॉफी मिळवण्यासाठी चढाओढ दिसत आहे. तसेच आता कोणतरी दोनजण बाहेर जाणून घरात टॉप ५ स्पर्धक घोषित केले जाणार आहे. अशातच बिग बॉसच्या तिसऱ्या पर्वातील पहिला फायनॅलिस्ट घोषित झाला आहे. या पर्वात कोण विजेता याची उत्सुकता सगळ्यांना लागली आहे. अशातच घरातील पहिला फायनॅलिस्ट घोषित झाल्याने सगळ्यांना आनंद झाला आहे. तो स्पर्धक म्हणजे वन अँड ओन्ली विशाल निकम.
बिग बॉसच्या घरात ‘झोंबिवली‘ या चित्रपटाचे कलाकार वैदेही परशुरामी, अमेय वाघ आणि ललित प्रभाकर हे चित्रपटाचे प्रमोशन करण्यासाठी आले होते. यावेळी त्यांनी घरात एक खेळ खेळून या पर्वाचा पहिला फायनॅलिस्ट घोषित केला आहे. यावेळी त्यांनी सुरुवातीला सगळ्यांना खूप घाबरवले. त्यानंतर त्यांनी घरात एक मजेशीर खेळ घेतला. (Vishal nikam become first finalist of bigg boss marathi 3)
विशाल, उत्कर्ष आणि मीरा यांना एका ठिकाणी बसून ३३ मिनिट मोजायला सांगितले. कोणत्याही गोष्टीचा सहारा नसताना त्यांना हे मिनिट मोजायचे असते. तसेच ज्याचे मिनिट पूर्ण होतील त्याला घंटी वाजवायला दिली होती. त्यावेळी घरातील बाकी सदस्यांना त्यांचे लक्ष विचलित करायचे असते. यावेळी सगळेच हा टास्क खूप चांगल्या पद्धतीने खेळत असतात. तेव्हा सर्वात जास्त म्हणजेच २९ मिनिटे मोजून विशाल निकम विजेता घोषित होतो.
यानंतर त्याच्या टीममध्ये आनंदाचे वातावरण पाहायला मिळते. सगळेच त्याला अभिनंदन करतात. विशाल निकम हा बिग बॉसच्या घरातील एक लोकप्रिय स्पर्धक आहे. सोशल मीडियावर त्याचे अनेक चाहते आहेत. तसेच विशालला सगळ्यांचा खूप पाठिंबा मिळत आहे. तो या पर्वाचा विजेता व्हावा अशी अनेकांची इच्छा आहे. आतापर्यंत तो अनेकवेळा नॉमिनेट झाला आहे. परंतु त्याच्या चाहत्यांनी नेहमीच त्याला व्होट करून सेफ केले आहे. या आठवड्यात घरात उत्कर्ष, मीरा, जय, सोनाली आणि विकास नॉमिनेट आहेत. त्यामुळे आता या आठवड्यत घरातून कोण बाहेर जाईल हे पाहण्यासाठी सगळेच खूप उत्सुक आहेत.
हेही वाचा :
अरेरे! ट्रोलर्सने नव्हे, तर यावेळी अनन्या पांडेनेच केलं स्वतःला ट्रोल; लिहिलं ‘असं’ विचित्र कॅप्शन
चला सासरी! तब्बल ‘इतक्या’ कोटींच्या आलिशान कारमध्ये सासरी पोहोचली अंकिता, किंमत वाचून फिरतील डोळे
सुमेध मुद्गलकरच्या ‘डान्स महाराष्ट्र डान्स’च्या ऑडिशनला ९ वर्ष पूर्ण, व्हिडिओ घालतोय धुमाकूळ