अरेरे! ट्रोलर्सने नव्हे, तर यावेळी अनन्या पांडेनेच केलं स्वतःला ट्रोल; लिहिलं ‘असं’ विचित्र कॅप्शन

बॉलिवूड अभिनेत्री अनन्या पांडे (Ananya Panday) सोशल मीडियावर खूप सक्रिय असते. चाहत्यांना खुश ठेवण्यासाठी ती सतत तिचे वेगवेगळे फोटोशूट शेअर करत असते. अनन्याच्या फोटोंवर चाहते अनेकदा प्रेमाचा वर्षाव करतात. तर त्याचबरोबर काहीवेळा तिला ट्रोलिंगचा सामनाही करावा. अशा परिस्थितीत अनन्याने पुन्हा एकदा तिचे फोटो शेअर केले आहेत. मात्र यावेळी अभिनेत्रीनेच स्वतःला ट्रोल केले आहे.

नुकतेच अनन्याने तिचे लेटेस्ट फोटो तिच्या इंस्टाग्राम अकाऊंटवर शेअर केले आहेत. या फोटोंमध्ये ती खूपच सुंदर आणि स्टायलिश दिसत आहे. या फोटोंमध्ये तिची निराळी स्टाईल पाहायला मिळत आहे. खरं तर या फोटोंमध्ये अनन्याने जाळ्यासारखे कापड घातले आहे. त्याच वेळी, हे फोटो शेअर करत अनन्याने लक्षवेधी कॅप्शन लिहिले आहे. शिवाय शेवटी अनन्याने पॅक केलेल्या सफरचंदाचा एक फोटो पोस्ट केला आणि स्वतःलाच ट्रोल केले आहे. अनन्याने तिच्या पोस्टसोबतच्या कॅप्शनमध्ये लिहिले की, “मला पूर्ण जाणीव आहे की, मी एका फळासारखी दिसते, जी वेबवर पॅक करून येते.” (ananya panday trolled herself on instagram)

View this post on Instagram

A post shared by Ananya ???????? (@ananyapanday)

चंकी पांडेची मुलगी आहे अनन्या
अनन्या पांडेचा जन्म ३० ऑक्टोबर १९९८ रोजी मुंबईत अभिनेता चंकी पांडे (Chunky Panday) आणि भावना पांडे यांच्या घरी झाला. अनन्या पांडे आर्यन खानची (Aryan Khan) बहीण सुहाना खानची (Suhana Khan) बालपणीची मैत्रीण आहे आणि त्या अनेकदा सोशल मीडियावर एकमेकांबद्दलचे प्रेम व्यक्त करताना दिसतात.

‘SOY2’ने केलं पदार्पण
साल २०१९ मध्ये, अनन्या पांडेने ‘स्टुडंट ऑफ द इयर २’ या चित्रपटाद्वारे बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. या चित्रपटात तिच्यासोबत तारा सुतारिया आणि टायगर श्रॉफ दिसले होते. यानंतर, अनन्या पांडे कार्तिक आर्यन आणि भूमी पेडणेकरसोबत ‘पति पत्नी और वो’ चित्रपटात दिसली. अनन्या पांडे आत्तापर्यंत फक्त तीनच चित्रपटात दिसली आहे आणि तिचा तिसरा चित्रपट ईशान खट्टरसोबत ‘खाली पीली’ हा होता. तिच्या आगामी चित्रपटांबद्दल बोलायचे झाले, तर ती लवकरच दिग्दर्शक शकुन बत्राच्या अनटाइटल्ड रोमँटिक ड्रामा चित्रपटात दिसणार आहे.

याशिवाय साऊथ स्टार विजय देवरकोंडासोबतचा ‘लायगर’ हा चित्रपटही अनन्याच्या खात्यात आहे. या दोन चित्रपटांशिवाय अनन्याने ‘खो गये हम कहाँ’ नावाचा आणखी एक चित्रपट साइन केला आहे. ‘खो गये हम कहाँ’ मध्ये अनन्यासोबत सिद्धांत चतुर्वेदी आणि आदर्श गौरव दिसणार आहेत. माध्यमातील वृत्तानुसार, २३ वर्षीय अनन्याची एकूण संपत्ती ७२ कोटी आहे.

हेही वाचा-

Latest Post