चला सासरी! तब्बल ‘इतक्या’ कोटींच्या आलिशान कारमध्ये सासरी पोहोचली अंकिता, किंमत वाचून फिरतील डोळे

‘पवित्र रिश्ता’ फेम अंकिता लोखंडे हिने १४ डिसेंबर रोजी तिचा बॉयफ्रेंड विकी जैन याच्यासोबत लग्नगाठ बांधली. अंकिता आणि विकी त्यांच्या लग्नाच्या फोटोंमुळे सोशल मीडियावर वर्चस्व गाजवत आहेत. अंकिताच्या लग्नाचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. ज्यामध्ये अभिनेत्री तिच्या लग्नातच खूप धमाल करताना दिसत आहे. अंकिता लग्नबंधनात अडकल्यानंतर अभिनेत्री पहिल्यांदाच तिच्या पतीसोबत सासरच्या घरी जाताना दिसली. कपाळावर सिंदूर, गळ्यात मंगळसूत्र आणि निळ्या रंगाच्या लेहेरिया साडीत अंकिताच्या चेहऱ्यावर नववधूचा नूर स्पष्टपणे दिसला, पण यानिमित्ताने तिच्या कारने सर्वांचेच लक्ष वेधून घेतले.

अंकिता (Ankita Lokhande) जेव्हा तिच्या सासरच्या घरी पोहोचली, तेव्हा तिथे आधीच पॅपराजींची गर्दी होती. त्यांनी अंकिताला काही फोटोंसाठी विनंती केली, त्यानंतर अभिनेत्री आपल्या पतीसोबत कारमधून खाली उतरली आणि अनेक फोटो क्लिक केले. मात्र, यासोबतच सर्वांच्या नजरा त्यांच्या गाडीवर खिळल्या होत्या.

पती विकी जैनसह (Vikcy Jain) नववधू अंकिता ज्या आलिशान कारमध्ये आली होती, त्या कारची किंमत वाचून तुमचेही भान हरपेल. अंकिता पोर्शे ७१८ बॉक्सटर एस कारमध्ये आपल्या सासरी पोहोचली होती. या कारची किंमत १.२६ कोटी रुपये आहे.

View this post on Instagram

A post shared by RWRB© (@officialredwhiteandroyalblue)

मुंबईतील ग्रँड हयात येथे अंकिता आणि विकी यांचे लग्न झाले होते. जिथे त्यांचे जवळचे मित्र आणि कुटुंबातील सदस्य पोहोचले होते. लग्नापूर्वी हळदी, मेहंदी, संगीत असे विधी केले गेले. दोघांनीही त्यांच्या कुटुंबीयांसाठी आणि मित्रांसाठी रिसेप्शनचे आयोजन केले होते. या रिसेप्शनमध्ये टीव्ही आणि फिल्म इंडस्ट्रीतील अनेक सेलिब्रिटी उपस्थित होते.

View this post on Instagram

A post shared by Viral Bhayani (@viralbhayani)

एकता कपूर, मृणाल ठाकूर, दिशा परमार, एजाज खान, पवित्रा पुनिया, माही विजय या सेलिब्रिटींनी लग्नाला हजेरी लावली. त्याचवेळी अभिनेत्री कंगना रणौतनेही तिच्या मैत्रिणीचे अभिनंदन करण्यासाठी तिच्या संगीत सोहळ्याला खास हजेरी लावली, ज्याचे फोटो चांगलेच व्हायरल झाले होते. अंकिताने कंगनासोबत ‘मणिकर्णिका’ या चित्रपटात काम केले आहे.

हेही वाचा-

Latest Post