Wednesday, March 12, 2025
Home मराठी अमृता खानविलकरचा बोल्ड अंदाज पाहून भल्या भल्यांच्या होतील बत्त्या गुल, पतीने देखील केली ‘ही’ कमेंट

अमृता खानविलकरचा बोल्ड अंदाज पाहून भल्या भल्यांच्या होतील बत्त्या गुल, पतीने देखील केली ‘ही’ कमेंट

मराठी मालिका, नाटक, चित्रपट, रियॅलिटी शो आणि हिंदी चित्रपटात काम करून नावारूपाला आलेली अभिनेत्री म्हणजे अमृता खानविलकर. अभिनयासोबतच तिच्या डान्स कौशल्याने तिने अवघ्या महाराष्ट्राला तिच्या प्रेमात पाडले आहे. तिच्या सौंदर्याने लाखो मुलांना भुरळ घातली आहे. सोशल मीडियावर देखील तिचे लाखोंमध्ये फॉलोवर्स आहेत. तिने ‘नटरंग’ या चित्रपटात ‘वाजले की बारा’ गाण्यावर डान्स करून आख्या महाराष्ट्राला वेड लावले होते. सोशल मीडियावर ती नेहमीच चर्चेत असते. तिच्या वेगवेगळ्या रूपाचे दर्शन ती सोशल मीडियाच्या माध्यमातून तिच्या चाहत्यांना देत असते. असाच तिचा एक ग्लॅमरस लूक समोर आला आहे.

अमृताने अधिकृत इंस्टाग्राम अकाउंटवरून तिचे काही फोटो शेअर केले आहेत. या फोटोमध्ये आपण पाहू शकतो की, अमृताने डिपनेक काळ्या रंगाचा ड्रेस घातला आहे. तिने केसांची पोनीटेल घालून स्मोकी आय मेकअप केला आहे. तसेच गळ्यात डायमंडचा नेकलेस घातला आहे. तिने ड्रेसला मॅचिऔग असे काळ्या रंगाचे हाय हिल्स घातले आहेत. तिच्या या लूकमध्ये ती खूपच बोल्ड दिसत आहे. (Amruta Khanvilkar share her bold look photos on social media)

तिच्या या लूकवर अनेकांच्या प्रतिक्रिया उमटत आहेत. अनेक कलाकार देखील या पोस्टवर कमेंट करत आहेत. खास गोष्ट म्हणजे अमृताच्या पती सिद्धार्थ मल्होत्राने देखील या फोटोवर ‘स्टनिंग’, अशी कमेंट केली आहे. यासोबत माही वीज, ईशा भन्साळी, प्रसाद ओक यांसारख्या कलाकारांनी या फोटोवर फायर ईमोजी पोस्ट केली आहे. तसेच तिचे अनेक चाहते देखील त्यांच्या प्रतिक्रिया देत आहेत. सध्या हे फोटो सोशल मीडियावर धुमाकूळ घालताना दिसत आहे.

अमृताने २००४ साली ‘इंडियाज बेस्ट सिनेस्टार की खोज’ या रियॅलिटी शोमध्ये भाग घेतला होता. त्यानंतर २००५ साली तिने ‘अदा’ आणि ‘टाईम बॉम्ब ९/१२’ या मालिकांमध्ये काम केले. तिच्या या पात्रांचे सर्वत्र कौतुक झाले. यानंतर २००६ साली तिला चित्रपटातून ऑफर आली. तिने ‘गोलमाल’ या मराठी चित्रपटातून चित्रपटसृष्टीत पदार्पण केले. याच वर्षी तिने ‘मुंबई सालसा’ या हिंदी चित्रपटात काम केले.

तिने २००७ साली ‘साडे माडे तीन’, ‘हॅट्रिक’, ‘कॉन्टॅक्ट’, ‘फुंक’, ‘दोघात तिसरा आता सगळं विसरा’, ‘गैर’, ‘नटरंग’, ‘झक्कास’, ‘धूसर’, ‘फक्त लढ म्हणा’, ‘सतरंगी’, ‘शाळा’, ‘आयना का बायना’, ‘हिंमतवाला’, ‘बाजी’, ‘वेलकम जिंदगी’, ‘कट्यार काळजात घुसली’, ‘बस स्टॉप’, ‘वन वे तिकीट’, ‘मलंग’, ‘वेल डन बेबी’ यांसारख्या चित्रपटात काम केले.

हेही वाचा :

 ‘तिच्या’ प्रेमात पूर्णपणे वेडा झाला होता गोविंदा, पण आईसमोर झाली अभिनेत्याची बोलतीच बंद

सायरा बानो यांच्या अभिनयापेक्षा त्यांच्या ग्लॅमरचीच रंगली होती चर्चा, अभिनेत्रीने दिले ‘असे’ प्रत्युत्तर

मल्लिका शेरावतपासून रेखापर्यंत, कोणाचं १२ तर कोणाचं केवळ १० महिनेच टिकलंय लग्न! 

 

हे देखील वाचा