मल्लिका शेरावतपासून रेखापर्यंत, कोणाचं १२ तर कोणाचं केवळ १० महिनेच टिकलंय लग्न!


बॉलिवूडमध्ये असे अनेक सेलिब्रिटी आहेत, ज्यांच्या प्रेमाने तरुण मंडळीसाठी उदाहरणे कायम केली. मात्र काही असेही सेलिब्रिटी आहेत, ज्यांचे लग्न फार कमी काळ टिकू शकले. मल्लिका शेरावतपासून रेखापर्यंत, असे अनेक सेलिब्रिटी आहेत, ज्यांचे लग्न एकेकाळी चर्चेत आले होते. परंतु कमी कालावधीत या जोड्या कोणत्या ना कोणत्या कारणाने तुटल्या.

रेखा (Rekha)
बॉलिवूडची एव्हरग्रीन अभिनेत्री म्हणून ओळखल्या जाणाऱ्या रेखा यांनी १९९० मध्ये, दिल्लीस्थित बिझनेस मॅन मुकेश अग्रवालसोबत लग्न केले होते. मात्र, नैराश्येमुळे मुकेश यांनी १९९१ मध्ये आत्महत्या केली आणि अवघ्या ११ महिन्यांतच रेखा विधवा झाल्या. (these bollywood celebrities marriage last for very short period)

मल्लिका शेरावत (Mallika Sherawat)
मल्लिका शेरावतचा विवाह करण सिंग गिल नावाच्या पायलटशी झाला होता. मात्र, हे लग्न वर्षभरही टिकू शकले नाही. कारण, मल्लिकाला अभिनेत्री व्हायचे होते आणि लग्न तिच्या स्वप्नात अडथळे बनत होते.

किशोर कुमार (Kishor Kumar)
दिग्गज अभिनेते आणि गायक किशोर कुमार यांनी १९७६ साली अभिनेत्री योगिता बालीसोबत तिसरा विवाह केला. मात्र, लग्नानंतर दोन वर्षांतच दोघांचे लग्न तुटले. कारण, योगिता अभिनेता मिथुन चक्रवर्तीच्या प्रेमात पडल्या होत्या.

करण सिंग ग्रोव्हर (Karan Singh Grover)
करण सिंग ग्रोव्हरने अभिनेत्री बिपाशा बासूसोबत तिसरे लग्न केले आहे. माध्यमातील वृत्तानुसार, करणने पहिल्यांदा त्याची गर्लफ्रेंड श्रद्धा निगमसोबत लग्न केले होते, पण हे लग्न फक्त १० महिने टिकले.

मनिषा कोईराला (Manisha Koirala)
नेपाळी ब्युटी मनिषा कोईराला हिने २०१० मध्ये बिझनेसमॅन सम्राट दहलसोबत लग्न केले होते. लग्नानंतर काही वेळातच दोघांमध्ये कडाक्याचे भांडण झाले. परिणामी २०१२मध्ये घटस्फोट घेऊन दोघेही एकमेकांपासून वेगळे झाले.

हेही वाचा :


Latest Post

error: Content is protected !!