बिग बॉस मराठीचा १०० दिवसांचा प्रवास घरातील पाच सदस्यांनी पूर्ण केला आहे. खरंतर २४ तास कॅमेरासमोर राहून घरात आहे तसे वागणे हा खरा टास्क आहे. हा टास्क पूर्ण करून आता विशाल, विकास, मीनल, जय आणि उत्कर्ष हे पाच सदस्य राहिले आहेत. या शोमध्ये खडतर प्रवास करून हे स्पर्धक इथे पोहचले आहेत. अशातच बिग बॉसचा फिनाले चालू झाला आहे. घरात सगळ्या स्पर्धकांचा जोरदार परफॉर्मन्स चालू आहे.
घरातील तसेच घराबाहेर गेलेले सगळेच स्पर्धक जबरदस्त डान्स करत आहेत. घरात नुकतेच मीनल शाहचा डान्स परफॉर्मन्स झाला आहे. या धाकड गर्लचा डान्स पाहून सगळेच अवाक झाले आहेत. खेळात जसे ती तिचे नावीन्य दाखवत असते असेच या डान्समध्ये देखील तिचा जबरदस्त अंदाज पाहण्यास मिळाला आहे. तसेच आता विकास, विशाल, जय आणि उत्कर्ष देखील डान्स करणार आहेत.(Bigg Boss Marathi 3 : meenal Shah dance performance in grand finale)
तसेच घरातील एक एलिमीनेशन होऊन घरात टॉप ४ स्पर्धक राहणार आहेत. हे एलिमीनेशन मागील पर्वाचा विजेता शिव ठाकरे यांच्या हस्ते होणार आहे. शिव या घरात येणार आहे. तो येताना पाच लाख रुपये असणारी बॅग घेऊन येणार आहे. यावेळी मांजरेकर सांगतात की, “पाच लाख घ्या आणि बाहेर जा.” परंतु आता हे पाच लाख रुपये कोण घेतय आणि कोण या शोमधून बाहेर जाणार याकडे आख्या महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे.
या ग्रँड फिनालेमध्ये ‘आई मायेचं कवच’ या मालिकेतील कलाकार भार्गवी चिरमुले आणि तिच्या मुलीच्या भूमिकेत असणारी अभिनेत्री यांनी एन्ट्री केली. तसेच त्यांच्या मालिकेबाबत काही महिती दिली आणि सगळ्यांना ही मालिका बघा असे सांगितले.
हेही वाचा :
पूजा सावंत फिल्म फेअर ट्रॉफीप्रमाणे दिसते ? फोटोवरील चाहत्याची ‘ती’ कमेंट आली जोरादार चर्चेत
बिग बॉस मराठीच्या घरातून पाच लाख घेऊन उत्कर्ष शिंदे होणार बाहेर? व्हायरल व्हिडिओमुळे रंगली चर्चा