पूजा सावंत फिल्म फेअर ट्रॉफीप्रमाणे दिसते ? फोटोवरील चाहत्याची ‘ती’ कमेंट आली जोरादार चर्चेत


मराठी चित्रपटसृष्टीत अनेक सुंदर अभिनेत्री आहेत. ज्या त्याच्या अभिनयाच्या आणि सौंदर्याच्या जोरावर इंडस्ट्रीमध्ये टिकून आहेत. याच यादीतील एक नाव म्हणजे पूजा सावंत होय. चित्रपटासोबत सध्या पूजाचा सोशल मीडियावर देखील मोठ्या प्रमाणात वावर वाढला आहे. सातत्याने तिचे सुंदर फोटो आणि व्हिडिओ ती तिच्या चाहत्यांसाठी शेअर करत असते. अष्स्तच तिचे काही ग्लॅमरस फोटो सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहे.

पूजाने अधिकृत इंस्टाग्राम अकाऊंटवरून काही फोटो शेअर केले आहेत. या फोटोमध्ये आपण पाहू शकता की, पूजाने काळ्या रंगाचा सुंदर असा लॉन्ग ड्रेस घातला आहे. तसेच पायात हाय हिल्स घातले आहेत. तिने या ड्रेसवर डायमंडचे इअरिंग घातले आहेत. फोटोत ती खूपच ग्लॅमरस दिसत आहे. ती वेगवेगळ्या बोल्ड पोझ देताना दिसत आहे. तिचा हा सगळ्यांना आकर्षित करणारा लूक तिच्या चाहत्यांना खूप आवडला आहे.  (pooja sawant share her beautiful photos on social media)

हे फोटो शेअर करून पूजाने कॅप्शन दिले आहे की, “स्वतःवर प्रेम करणे हे एका ढालीप्रमाणे आहे, ते प्रत्येकाला आलेच पाहिजे.” तिच्या अनेक चाहत्यांना हा फोटो खूप आवडला आहे. अनेकजण या फोटोवर कमेंट करत आहेत. एका चाहत्याने या फोटोवर कमेंट केली आहे की, “फिल्म फेअर ट्रॉफीप्रमाणे दिसत आहे.” तिची पोझ पाहून तिच्या एका चाहत्याने कमेंट केली आहे की, “बाबांनी चॉकलेट आणलं नाही म्हणून रस्ता अडवून बसलेली.” तसेच बाकी अनेकजण या व्हिडिओवर हार्ट आणि फायर इमोजी पोस्ट करत आहेत.

पूजा सावंतच्या कामाबद्दल बोलायचे झाल्यास, तिने ‘क्षणभर विश्रांती’ या चित्रपटातून २०१० मध्ये चित्रपटसृष्टीत प्रवेश केला होता. या चित्रपटात तिने भरत जाधव, सिद्धार्थ जाधव, सचित पाटील, सोनाली कुलकर्णी या कलाकारांसोबत काम केले होते. त्यानंतर तिने ‘दगडी चाळ’, ‘लपाछपी’, ‘झकास’, ‘नीलकंठ मास्टर’, ‘चिटर’, ‘वृंदावन’, ‘पोश्टर बॉईज’ या चित्रपटात काम केले आहे. पूजा सावंत तिच्या डान्समुळे देखील खूप लोकप्रिय आहे. नुकतेच तिचा ‘विजेता’ हा चित्रपट प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटात तिच्यासोबत सुबोध भावे आहे.

हेही वाचा :

‘ही दोस्ती तुटायची नाय’, बिग बॉस मराठीच्या ग्रँड फिनालेला दिसणार ‘या’ स्पर्धकांचे मैत्रीप्रेम

बिग बॉस मराठीच्या घरातून पाच लाख घेऊन उत्कर्ष शिंदे होणार बाहेर? व्हायरल व्हिडिओमुळे रंगली चर्चा

‘आनंदी राहण्यासाठी रिस्क घ्यावी लागते’, म्हणत सुश्मिताने शेअर केली पोस्ट ‘याच’ कारणामुळे झाले त्यांचे ब्रेकअप? 

 


Latest Post

error: Content is protected !!