Monday, December 23, 2024
[aioseo_breadcrumbs]

डॉक्टर उत्कर्ष शिंदे झाला बिग बॉसच्या घराबाहेर, तिसऱ्या पर्वाला मिळाले टॉप ३ स्पर्धक

बिग बॉस मराठीच्या तिसऱ्या पर्वाला टॉप ३ स्पर्धक मिळाले आहेत. घरातून गायक, संगीतकार आणि डॉक्टर उत्कर्ष शिंदे बाहेर पडला आहे. बिग बॉसमधील उत्कर्षचा प्रवास खूपच रंगतदार होता. त्याने बिग बॉस च घरात सगळ्यांचे मनोरंजन केले आहे. त्याच्या विनोदी शैलीने त्याने आख्ख्या महाराष्ट्राला हसवले आहे.

उत्कर्ष ने त्याच्या संगीत कौशल्याने बिग बॉसच्या घरातील प्रवास सर्वांना आठवणीत राहील असा केला आहे. उत्कर्षला पहिल्याच आठवड्यात ‘मास्टरमाईंड’ ही पदवी मिळाली. त्याने नेहमीच प्लॅन करून हा गेम खेळला आहे. घरात उत्कर्ष, जय आणि मीरा यांची मैत्री खूप गाजली. जय आणि त्याला तर ‘जय विरू’ असे नाव पडले आहे.( Bigg Boss Marathi 3 : utkarsh shinde eliminate from BBM house)

तो घरातून बाहेर गेल्यावर आता घरात विशाल निकम, विकास पाटील आणि जय दुधाने उरले आहेत. हे बिग बॉसच्या घरातील टॉप ३ स्पर्धक आहेत. त्यामुळे आता त्यांच्यापैकी कोण विजेता होणार आहे याची माहिती प्रेक्षकांना थोड्याच वेळात मिळणार आहे. यानंतर आणखी एक एलिमिनेशन होणार आहे. घरात टॉप २ स्पर्धक राहणार आहेत आणि मग त्यानं बाहेर स्टेजवर बोलावून विजेता घोषित करणार आहे. याच बरोबर बाकी स्पर्धकांचा जोरदार डान्स पाहायला मिळत आहे.

हेही वाचा :

बिग बॉस मराठीच्या तिसऱ्या पर्वातून धाकड गर्ल बाहेर, मीनल शाह ट्रॉफीपासून झाली दूर

एका चित्रपटाच्या शूटिंग दरम्यान जॅकी श्रॉफ यांनी ‘या’ कारणामुळे लगावली होती अनिल कपूर यांच्या कानशिलात

मीनल शाहच्या रंगतदार परफॉर्मन्सने रंगला बिग बॉस मराठीचा ग्रँड फिनाले, पाहा झलक

 

हे देखील वाचा