Monday, December 23, 2024
[aioseo_breadcrumbs]

‘असा’ दिसत होता २८ वर्षांपूर्वी कपिल शर्मा; रियॅलिटी शो जिंकल्यानंतर मिळाले होते तब्बल ‘इतके’ लाख रुपये, पहिल्याच कष्टाच्या कमाईतून केले होते बहिणीचे लग्न

कॉमेडीचा बादशाह अस ज्याला संबोधलं जातं, तो म्हणजे ‘कपिल शर्मा’. त्याने नुकतेच त्याच्या सोशल मीडिया अकाउंटवर एक 28 वर्षांपूर्वीचा जुना फोटो शेअर केला आहे. ज्यात तो ओळखताही येत नाहीये. हा त्याच्या बालपणीचा फोटो आहे. त्या फोटोत तो आपला मोठा भाऊ अशोक यांच्यासोबत आहे. पाहायला गेलं तर आता ‘कपिल शर्मा’ हे असं नाव बनलं आहे की, घराघरात लहान मुलांपासून ते ज्येष्ठ नागरिकांपर्यंत सगळेजण त्याला ओळखतात. कपिल शर्माचा जन्म 2 एप्रिल 1981 मध्ये पंजाब येथील अमृतसरमध्ये झाला. चला तर जाणून घेऊया कपिल शर्माच्या आयुष्यातील कधीही न पाहिलेल्या गोष्टी.

…आणि असा केला प्रवास
कपिल शर्माने लाफ्टर चॅलेंजचं तिसरं‌‌ पर्व जिंकून या इंडस्ट्रीमध्ये प्रवेश केला. तसेच स्वत:चं स्थान निर्माण केलं. लाफ्टर चॅलेंजच तिसरं पर्व जिंकल्यावर त्याला 10 लाख रुपये मिळाले होते. या मिळालेल्या पहिल्याच कष्टाच्या कमाईने त्याने आपल्या बहिणीचं लग्न केले होते. त्यानंतर त्याने अनेक शोमध्ये काम केलं. त्याला नंतर हिंदीसोबतच अनेक पंजाबी शोमध्येदेखील काम करण्याची संधी मिळाली. त्याने जवळपास 6 लाफ्टर शो जिंकले आहेत. कपिल शर्मा हा त्या व्यक्तींपैकी एक आहे, ज्याचे शो त्यांच्याच नावाने ओळखले जातात.

कपिल शर्माला लाफ्टर चॅलेंज 3 साठी अमृतसरमध्ये नाकारलं गेलं होतं. त्यानंतर त्याने दिल्लीला जाऊन ऑडिशन दिलं आणि त्यानंतर त्याला लाफ्टर चॅलेंज 3 मध्ये सिलेक्ट केलं. कपिल शर्माचा शो ‘कॉमेडी नाईट्स विथ कपिल शर्मा’ जेव्हा हिट झाला, तेव्हा त्याचं नाव शोचा क्रिएटिव्ह डायरेक्टर प्रीती सिमोससोबत जोडलं गेलं.

विवादांमध्येही सापडलाय कपिल
माध्यमातील वृत्तानुसार, एका मराठी पुरस्कार सोहळ्यामध्ये कपिल शर्मावर असा आरोप केला गेला होता की, त्याने नशा करून गायक ‘मोनाली ठाकूर’ आणि ‘तनिषा मुखर्जी’ हिच्यासोबत छेडछाड केली. परंतु या गोष्टीला ना ही कपील शर्माने कधी नाकारलं आणि ना ही कधी या गोष्टी स्वीकारून त्या दोघींची माफी मागितली.

कपिलच्या अशा गोष्टींमुळे देखील अनेकवेळा त्याच्या प्रतिमेला डाग लागला. एकदा कपिलने, शो होस्ट करण्यासाठी 1.25 करोड मागितले होते. त्यानंतर त्याने तेथील लोकांना खूप त्रास दिला. त्याच्यासाठी अनेक स्टार्सनी त्याची वाट सुद्धा पाहिली आहे. त्या वाट बघणाऱ्या स्टार्समध्ये ‘अजय देवगण पासून श्रध्दा कपूर, सोनाक्षी सिन्हा आणि शाहरुख खान ‘हे सगळे सामील आहेत.

कपिलने बीएमसीच्या कर्मचाऱ्यांवर घुसखोरीचा आरोप लावून नरेंद्र मोदी यांना ट्विटरवर टॅग देखील केले होते. त्यानंतर त्याने ओशिवारा ऑफिसमध्ये झालेले बेकायदेशीर बांधकाम प्रकरण पुढे आले. परंतु कपिल असे सांगत होता की, बिल्डिंगमध्ये चालू असणार सगळं काम प्लॅन नुसारच चालू होतं.

कपिल शर्मा बऱ्याच दिवसांपासून तणावात होता. त्यानंतर त्याने कामातून थोडा ब्रेक घेऊन परत कपिल शर्मा शो चालू केला.

कपिलची कॉमिक टायमिंग आणि वेगळाच अंदाज यामुळे त्याचा शो खूपच लोकप्रिय झाला. या कारणामुळेच कपिल फोर्ब्समधील सगळ्यात श्रीमंत भारतीय सेलिब्रिटीच्या टीमच्या यादीत 2017 मध्ये 17 या क्रमांकावर होता.

गिन्नी चितरथसोबत केले लग्न
कपिलने 2018 मध्ये आपली गर्लफ्रेंड ‘गिन्नी चतरथ’ हिच्यासोबत लग्न करून आपल्या वैवाहिक जीवनाला सुरुवात केली. लग्नाच्या एका वर्षानंतर त्यांना एक गोड मुलगी झाली. जीचं नाव त्यांनी ‘अनायरा शर्मा’ असं ठेवलं आहे. आणि कपिल आता दुसऱ्यांदा बाबा झाला आहे. पत्नी सोबत वेळ घालवण्यासाठी कपिल यांनी कपिल शर्मा या शो मधून 1 वर्ष विश्रांती घेण्याच्या निर्णय घेतला आहे.

महत्त्वाच्या बातम्या-

गुड न्यूज! कपिल शर्मा दुसर्‍यांदा बनला बाबा; चाहत्यांकडून शुभेच्छांचा वर्षाव

‘द कपिल शर्मा शो’ बंद होण्यामागचे खरं कारण आलं समोर, खुद्द कपिल शर्मानंच समोर येत दिलं उत्तर

प्रेक्षकांना खळखळून हसवणारा ‘द कपिल शर्मा’ घेतोय आपला निरोप, पाहा काय आहे कारण

 

हे देखील वाचा