‘द कपिल शर्मा शो’ बंद होण्यामागचे खरं कारण आलं समोर, खुद्द कपिल शर्मानंच समोर येत दिलं उत्तर


विनोदवीर म्हणून प्रसिद्ध असणारा कपिल शर्मा सध्या पुन्हा चर्चेत आला आहे. कपिलचा लोकप्रिय कॉमेडी शो ‘द कपिल शर्मा शो’ हा लवकरच बंद होणार असल्याच्या बातम्या मागच्या अनेक दिवसांपासून येत आहेत. मात्र याबाबत कोणतीही अधिकृत माहिती समोर अली नव्हती पण आता स्वतः कपिलने ट्विटरवर ही माहिती दिली आहे.

सोनी टीव्हीवर येणारा ‘द कपिल शर्मा शो’ हा पुढच्या महिन्यात बंद होणार आहे. जेव्हा या बातम्या समोर यायला लागल्या तेव्हा अनेकांनी वेगवेगळी कारणे दिली, चित्रपट प्रदर्शित होत नसल्याने कलाकार येत नाहीये, प्रेक्षक नाहीये आदी अनेक तर्क वितर्क लावले जात होते. पण आता या शो चे बंद होण्याचे खरे कारण समजले असून त्याबद्दल माहिती खुद्द कपिल शर्मानेच दिली आहे.

कपिलने फॅन्ससोबत एक चॅट सेशनमध्ये काही प्रश्नांची उत्तरे दिली आहेत. कपिल शर्माला ट्विटरवर एका फॅनने विचारले की, खरंच हा शो बंद होत आहे का? त्यावर कपिलने सांगितले की, “अगदी छोटासा ब्रेक घेत आहोत.” अर्थात हा शो बंद होणार असून पुन्हा लवकर सुरु होणार आहे.

पुढे त्याच्या एका फॅनने विचारले की, हा शो का बंद होत आहे यावर त्याने उत्तर दिले की, “नवीन बाळाच्या स्वागतासाठी आता मला माझ्या पत्नीसोबत घरी राहण्याची जास्त गरज आहे. ”

त्यावर अजून एकाने विचारले की, तुम्हाला अनायरासाठी काय पाहिजे, बहीण की भाऊ? त्यावर कपिलने उत्तर दिले, ” मुलगा असो की मुलगी फक्त तंदरुस्त बाळ पाहिजे.”

काही दिवसांपूर्वी कपिलने त्याचा एक विडिओ सोशल मीडियावर शेयर करत सांगितले होते की तो लवकरच नेटफ्लिक्सवर येणार आहे. हा विडिओ पोस्ट करताना त्याने लिहिले की, “अफवांवर विश्वास ठेऊ नका, माझ्यावर विश्वास ठेवा, मी लवकरच नेटफिल्क्सवर/”

नुकतीच कपिलने त्याच्या यूट्यूब चॅनेलवर Behind The Jokes With Kapil ही सिरीज सुरु केली आहे.


Leave A Reply

Your email address will not be published.