Sunday, February 23, 2025
Home बॉलीवूड शर्वरी वाघ आहे सनी कौशलसोबत रिलेशनशिपमध्ये? स्वतःच सांगितले त्यांच्या नात्याचे सत्य

शर्वरी वाघ आहे सनी कौशलसोबत रिलेशनशिपमध्ये? स्वतःच सांगितले त्यांच्या नात्याचे सत्य

शर्वरी वाघ आणि विकी कौशलचा भाऊ सनी कौशल एकमेकांसोबत रिलेशनशिपमध्ये आहेत आणि दोघेही एकमेकांना डेट करत असल्याच्या माध्यमांमध्ये बातम्या येत होत्या. पण आता कथेत ट्विस्ट आला आहे. शर्वरीने स्वतः सांगितले आहे की, ती आणि सनी फक्त एकमेकांचे चांगले मित्र आहेत आणि ते एकमेकांना डेट करत नाहीत. या महिन्याच्या सुरुवातीला विकी (Vicky Kaushal) आणि कॅटरिना कैफच्या (katrina kaif) लग्नात ही अभिनेत्री दिसली होती. शर्वरीने (Sharvari Wagh) कपलच्या लग्नाच्या फोटोंवर कमेंट करून कॅटरिना आणि विकीच्या कुटुंबावर प्रेम व्यक्त केले.

नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत शर्वरीने तिच्या आणि सनी कौशलच्या नात्याबद्दल सत्य सांगितले आहे. तिने सांगितले की, ती आणि सनी गेल्या चार वर्षांपासून एकमेकांचे मित्र आहेत. दोघेही प्रथमच अमेझॉन प्राइम सीरीज ‘द फॉरगॉटन आर्मी – आझादी के लिए’मध्ये दिसले होते. त्यानंतर दोघांची मैत्री झाली आणि चार वर्षांत दोघेही आणखी चांगले मित्र बनले. तिने सांगितले की, खरे सांगायचे झाले, तर त्यांच्या अफेअरच्या बातम्या केवळ अफवा आहेत.

विकी कौशल आणि कॅटरिना कैफच्या लग्नात शर्वरीने लावली होती हजेरी

राजस्थानच्या फोर्ट बरवाडा येथे ९ डिसेंबरला झालेल्या विकी आणि कॅटरिनाच्या लग्नाचे आमंत्रण खास लोकांना पाठवण्यात आले होते, त्यात शर्वरी वाघ देखील एक होती. तिनेही लग्नाला हजेरी लावली होती आणि तेव्हापासून सनी आणि शर्वरीच्या नात्याच्या बातम्या येत होत्या. माध्यमांतील वृत्तानुसार, शर्वरीने लग्नात खूप धमाल केली होती. कॅटरिनाच्या भावाने स्वत: त्याच्या इंस्टा पोस्टमध्ये शर्वरीचा उल्लेख केला होता.

शर्वरी दिसली होती ‘बंटी और बबली २’मध्ये 

सध्या शर्वरी वाघचे लक्ष तिच्या करिअरवर आहे. नुकताच ती ‘बंटी और बबली २’मध्ये दिसली होती. या चित्रपटातून तिने मोठ्या पडद्यावर पदार्पण केले. या चित्रपटातील तिच्या कामाची चांगलीच दखल घेतली गेली आहे. सिध्दांत चतुर्वेदीसोबत तिची जोडी खूप छान जमली आहे.

हेही वाचा :

हे देखील वाचा