ट्विटरवर ‘अतरंगी रे’ विरोधात मोहीम, अक्षय-सारा अन् धनुषच्या चित्रपटावर ‘या’ गोष्टीला प्रोत्साहन दिल्याचा आरोप


ओटीटी प्लॅटफॉर्मवर २४ डिसेंबरला प्रदर्शित झालेला आनंद एल राय दिग्दर्शित ‘अतरंगी रे’ अडचणीत सापडला आहे. या चित्रपटात सारा अली खान, धनुष आणि अक्षय कुमार यांच्या प्रमुख भूमिका आहेत. हा चित्रपट नुकताच डिझनी प्लस हॉटस्टारवर प्रदर्शित झाला. हा चित्रपट प्रेक्षकांना खूप आवडला आहे. या चित्रपटाला प्रेक्षकांचा खूप सकारात्मक प्रतिसाद मिळत आहे. मात्र आता दुसरीकडे ट्विटरवर चित्रपटावर बहिष्कार टाकण्याची मागणी होत आहे.

‘यामुळे’ चित्रपटावर बहिष्कार टाकण्याची होत आहे मागणी

खरतर, ट्विटरवर चित्रपटावर बहिष्कार टाकण्याची मागणी सातत्याने होत आहे. ‘अतरंगी रे’च्या माध्यमातून लव्ह जिहादचा प्रचार केला जात असल्याचे लोकांचे म्हणणे आहे. ट्विटरवर संध्याकाळपासून ‘बॉयकॉट अतरंगी रे’ ट्रेंड करत आहे. हा ट्रेंड पुढे नेत अनेक युजर्स ट्वीटच्या माध्यमातून चित्रपटाबद्दल नकारात्मक प्रतिक्रिया देत आहेत. या चित्रपटात अक्षय कुमार मुस्लिम पुरुषाची तर सारा अली खान हिंदू मुलीची भूमिका साकारत आहे.

भूमिकांवर उठवले प्रश्न

खरंतर, या चित्रपटात अक्षय कुमारचे नाव सज्जाद अली खान आहे आणि सारा अली खान या चित्रपटात हिंदू तरुणी रिंकू रघुवंशीची भूमिका साकारत आहे. साराला चित्रपटात रिंकूच्या आईच्याही भूमिकेत दाखवण्यात आले आहे, जी सज्जाद अली खानच्या प्रेमात होती. अशा परिस्थितीत चित्रपटातील काही सीनमुळे हिंदूंच्या भावना दुखावल्या गेल्याचे लोकांचे म्हणणे आहे.

‘अतरंगी रे’ विरोधात ट्वीटचा महापूर

ट्विटरवर संध्याकाळपासून चित्रपटाविरोधात सतत ट्वीट करण्यात येत आहे. चित्रपटावर बंदी घालण्याची मागणी सातत्याने होत आहे. एका युजरने कमेंट करत लिहिले की, “हिंदी चित्रपट आणि मुस्लिम अभिनेत्याने हिंदू अभिनेत्रीशी लग्न केल्यामुळे लव्ह-जिहादला प्रोत्साहन दिले जात आहे. लव्ह जिहाद थांबवायचा असेल, तर सर्वप्रथम हिंदी चित्रपट निर्मितीवर ताबा ठेवावा लागेल.”

युजर्स म्हणाले, ‘हिंदू धर्माला लक्ष्य केले जात आहे’ 

आणखी एका युजरने ट्वीट करून लिहिले की, “बॉलिवुडमध्ये हिंदू धर्माला नेहमीच टार्गेट केले जाते आणि अनेक प्रसंगी त्याचा अपमान केला जातो. कारण इतकी वर्षे आपण हे शांतपणे सहन करत आहोत. म्हणूनच त्यांनी आम्हाला नम्र आणि दुर्बल समजण्यास सुरुवात केली आहे आणि ते त्यांना हवे ते करू शकतात.” यासोबतच युजरने अनेक वृत्तपत्रांच्या कटिंगही टाकल्या.

अक्षय कुमारला केले सर्वाधिक ट्रोल

‘अतरंगी रे’ विरुद्धच्या या मोहिमेत अक्षय कुमारला सर्वाधिक ट्रोल करण्यात आले. युजरने ट्वीट करून लिहिले की, “या चित्रपटातील ज्या व्यक्तिरेखेने सर्वाधिक लोकांना आश्चर्यचकित केले आहे ते म्हणजे अक्षय कुमार. अक्षय कुमार ज्याला एक मोठा वर्ग हिंदू आणि राष्ट्रवादी म्हणतो, तो संपूर्ण हिंदू धर्माला गोत्यात टाकणारी भूमिका वारंवार करतो.”

सारा अली खानने २०१८ मध्ये ‘केदारनाथ’ या चित्रपटाद्वारे तिच्या करिअरला सुरुवात केली. या चित्रपटात तिच्यासोबत दिवंगत अभिनेता सुशांत सिंग राजपूत दिसला होता. यानंतर तिने ‘लव्ह आज कल’ आणि ‘सिम्बा’मध्ये आपले अभिनय कौशल्य दाखवले आहे. सारा ‘कुली नंबर १’मध्ये वरुण धवन सोबत दिसली होती. ती आता अक्षय कुमार आणि धनुषसोबत ‘अतरंगी’मध्ये दिसली आहे.

हेही वाचा :


Latest Post

error: Content is protected !!