शाहिदच्या बहुचर्चित ‘जर्सी’ सिनेमाचे प्रदर्शन रद्द, कोरोनाच्या वाढत्या धोक्यामुळे चित्रपटाच्या टीमचा निर्णय


कोरोना व्हायरसमुळे संपूर्ण जगात लोकांचे खूप नुकसान झाले आहे. जवळपास एक ते दिड वर्ष चित्रपटगृह बंद होते. आताच काही महिन्यांपूर्वी चित्रपटगृह सुरू करण्यासाठी सरकारने परवानगी दिली. मात्र पुन्हा एकदा कोरोनाच्या नव्या विषाणूने तोंड वर काढायला सुरुवात केली असून, दिवसेंदिवस हा कोरोनाचा ओमिक्रोन विषाणू मोठ्या प्रमाणात देशात पसरत आहे. त्यामुळे ही स्थिती लक्षात घेऊन सरकार पुन्हा एकदा चित्रपटगृह बंद करू शकण्याची शक्यता नाकारता येत नाही. आतापर्यँत अनेक मोठे सिनेमे प्रदर्शित झाले मात्र अजूनही अनेक मोठे आणि बहुप्रतीक्षित सिनेमे प्रदसरहित होणे बाकी आहे. असे असली तरी आता या चित्रपटनावर चित्रपटगृह बंद होण्याची लटकटी तलवार आहे. हीच परिस्थिती समोर ठेऊन काही चित्रपटांची रिलीज डेट पुढे ढकलली जात आहे. यात शाहिद कपूर आणि मृणाल ठाकूर यांच्या ‘जर्सी’ सिनेमाचा देखील समावेश आहे. हा चित्रपट येत्या शुक्रवारी ३१ डिसेंबर रोजी चित्रपटगृहात प्रदर्शित होणार होता. परंतु ओमिक्रोनचे वाढणारे पेशंट आणि याचा धोका पाहून अनेक राज्यांमध्ये या कारणामुळे बंधने देखील लागू करण्यात आली आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार देशातील वातावरण बघता आता ‘जर्सी’ हा चित्रपट रिलीज होणार नाही. या चित्रपटातील कलाकारांनी असे सांगितले, “आतापर्यंत आमच्या चित्रपटावर तुम्ही खूप प्रेम केले. त्यासाठी तुम्हा सगळ्यांचे अभिनंदन. तुमच्या सर्वांना नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा.” ‘जर्सी’ चित्रपटाचे दिग्दर्शक आणि निर्मात्यांनी अद्याप या चित्रपटाच्या प्रदर्शनाची पुढील तारीख अद्याप ठरवलेले नाही. ‘जर्सी’ चित्रपट तेलगु चित्रपटाचा रिमेक असून, या चित्रपटाचे दिग्दर्शन गौतम तिन्नउरी यांनी केले होते.

ओमिक्रोन व्हायरस खूप वेगाने वाढत आहे. कित्येक राज्यांमध्ये सुरक्षेच्या दृष्टीने अनेक बंधने लागू केली आहेत. तर काही राज्यांमध्ये पुन्हा एकदा चित्रपटगृह बंद करण्यात आले आहेत. दिल्ली सरकारच्या या निर्णयामुळे जर्सी या चित्रपटाची रिलीज डेट पुढे ढकलली असल्याचे या चित्रपटातील सदस्यांनी सांगितले आहे.

जर्सी या चित्रपटाची चर्चा खूप दिवसांपासून सुरू आहे. शाहिद आणि मृणाल सिनेमाचे जोरात प्रमोशन देखील करत होते. सोशल मीडियावर तर चित्रपटाचा मोठा बोलबाला दिसून येत होता. कबीरसिंग नंतर शाहिद कपूरच्या या सिनेमाने प्रेक्षकांची आतुरता वाढवली आहे. मात्र आता त्यांना हा सिनेमा बघण्यस्तही अजून थोडी वाट बघावी लागणार आहे. या सिनेमाच्या गाण्यांनी आधीच प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत. आता हा सिनेमा कधी प्रदर्शित होतो हे बघावे लागेल.

हेही वाचा :


Latest Post

error: Content is protected !!