मराठी मालिकेतून अनेक जोड्या सुपरहिट झाले आहेत. तसेच ‘मिसेस मुख्यमंत्री’ मधील सुमी म्हणजेच अमृता धोंगडे आणि तिचा पायलट म्हणजे तेजस बर्वे हे प्रेक्षकांच्या फार पसंतीस पडले आहेत. या जोडीने मालिका क्षेत्रात प्रेक्षकांना भुरळ घातली आहे.या मालिकेने या मालिकेतील जोडीने जशी प्रेक्षकांची मने जिंकली. ती जोडी आता मोठ्या पडद्यावर ते आपल्याला दिसणार आहे. त्यात दोघेही मुख्य भूमिकेत आहेत आणि या सिनेमाचं नाव आहे दिशाभूल.
सानवी प्रोडक्शन हाऊस निर्मित आणि आशिष कैलाश जैन दिग्दर्शित ‘दिशाभूल’ त्याचा गणपती बाप्पा स्क्रिप्ट पूजन मोठ्या थाटामाटात पुण्यात पार पडले. यावेळी अभिनेता तेजस बर्वे, निर्मात्या आरती चव्हाण, नीलेश आर. विनोद नाईक, ऍड प्रज्ञावंत गायकवाड, गोपाळ कडावत, संगीतकार प्रथमेश धोंगडे, गीतकार हरिभाऊ धोंगडे, नृत्य दिग्दर्शक नील राठोड, कला दिग्दर्शक वैभव शिरोळकर, वेशभूषाकार शीतल माहेश्वरी यांच्यासह चित्रपटातील कलाकार व तंत्रज्ञ उपस्थित होते. (amruta dhongade and tejas barve’s new dishabul movie coming soon)
आशिष जैन म्हणाले की, “दिशाभूल हा चित्रपट सस्पेन्स थ्रिलर ड्रामा अशा कॉलेज लाईफ रोमान्सवर आहे. या चित्रपटात तेजस बर्वे, अमृता धोंगडे हे मुख्य भूमिकेत असून त्याचबरोबर मराठीतील दिग्गज अभिनेते-अभिनेत्री या चित्रपटात आपणास दिसून येणार आहेत. पूर्ण चित्रपट कॉलेज लाईफ रोमान्स फ्रेंडशिप या सगळ्या वरती भाष्य करणारा आहे. हा चित्रपट पाहताना प्रेक्षकांसाठी एक पर्वणीच असणार आहे.”
आरती चव्हाण या चित्रपटाचे निर्माते आहेत. निर्माते आरती चव्हाण म्हणतात की, “सानवी प्रॉडक्शनचा हा पहिलाच चित्रपट आहे. पहिला चित्रपट सस्पेन्स थ्रिलर रोमान्स या सगळ्या जॉनरनी भरलेला आहे. सानवी प्रोडक्शन्स हे पहिलंच वर्ष आणि या नववर्षात प्रेक्षकांच्या भेटीला नवा सिनेमा आम्ही घेऊन येणार आहोत. तेजस बर्वे आरती धोंगडे या मालिके क्षेत्रातील प्रेक्षकांच्या पसंतीस पडलेल्या जोडीची केमिस्ट्री या चित्रपटात पुन्हा पाहायला मिळेल. नववर्षाची सुरुवात आम्ही एक नवीन चित्रपट घेऊन करतो आहोत प्रेक्षकांनी तेवढाच भरभरून प्रतिसाद द्यावा.” त्यांचा हा चित्रपट पाहण्यासाठी त्यांचे चाहते खूप उत्सुक आहेत.
हेही वाचा :
- जागतिक हिंदी दिवसाच्या निमित्ताने ‘या’ कलाकारांनी सांगितले परदेशी लोकांसोबतचे हिंदी भाषेचे अनुभव
- सलमान खानच्या ‘बजरंगी भाईजान’ चित्रपटातील ‘मुन्नी’ने केला चमत्कार, मिळाला भारतरत्न डॉ. आंबेडकर पुरस्कार
- करिश्मा तन्नाने स्विमिंग पूलमधले बिकिनी फोटो शेअर करत लावली सोशल मीडियावर आग