Thursday, March 28, 2024

सलमान खानच्या ‘बजरंगी भाईजान’ चित्रपटातील ‘मुन्नी’ने केला चमत्कार, मिळाला भारतरत्न डॉ. आंबेडकर पुरस्कार

हर्षाली मल्होत्राने सलमान खानच्या ‘बजरंगी भाईजान’ या चित्रपटात लहान मुलगी मुन्नीची भूमिका साकारून प्रेक्षकांची आणि समीक्षकांची मने जिंकली. या चित्रपटातील हर्षालीच्या क्यूटनेसने सर्वांना खूप प्रेरित केले. या चित्रपटानंतर हर्षालीने तिच्या अभ्यासावर लक्ष केंद्रित केले. ती सोशल मीडियावर खूप सक्रिय असते आणि ती नेहमीच तिचे फोटो आणि व्हिडिओ चाहत्यांबरोबर शेअर करत असते.

आता अभिनेत्रीने एक पोस्ट केली आहे, ज्यामध्ये तिला पुरस्कार देण्यात आला आहे. अभिनेत्रीने हा पुरस्कार सलमान (Salman Khan) आणि ‘बजरंगी भाईजान’ चित्रपटाच्या टीमला समर्पित केला आहे. हर्षालीने (Harshali Malhotra) ते पत्रही शेअर केले आहे. ज्यामध्ये तिला पुरस्काराची माहिती देण्यात आली होती.

आगामी ७३ व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त भारतीय राज्यघटनेचे मुख्य शिल्पकार डॉ. बाबासाहेब भीमराव आंबेडकर यांच्या स्मरणार्थ १२ वा भारतरत्न डॉ. आंबेडकर पुरस्कार २०२२ समारंभ आयोजित करण्यात आला आहे.

याशिवाय तुम्ही टीव्ही आणि चित्रपटांमधूनही चांगला अभिनय केला आहे. भारतीय चित्रपट क्षेत्रातील तुमचे योगदान अतिशय महत्त्वाचे आणि प्रशंसनीय आहे, म्हणून आमच्या ज्युरी समितीने १२ व्या भारतरत्न डॉ. आंबेडकर पुरस्कार २०२२ साठी तुमचे नाव निश्चित केले आहे.

यानंतर हर्षालीने पुरस्कारासोबतचा तिचा फोटो शेअर करत लिहिले की, “मी हा पुरस्कार सलमान खान, कबीर खान, मुकेश छाबरा काकांना समर्पित करते, ज्यांनी माझ्यावर विश्वास दाखवला. तसेच संपूर्ण बजरंगी भाईजान टीमचे आभार. श्री भगतसिंग कोश्यारी यांच्या हस्ते भारतरत्न डॉ.आंबेडकर पुरस्कार मिळाला.” हर्षालीच्या या पोस्टवर सर्वजण तिचे अभिनंदन करत आहेत. यासोबतच ती पुन्हा चित्रपटात कधी दिसणार असा प्रश्नही चाहते विचारत आहेत.

चित्रपटाचा सिक्वेल

‘बजरंगी भाईजान’चा सिक्वेल बनवला जात आहे. कबीर खान यांनी याला दुजोरा दिला आहे. मात्र, चित्रपटाच्या कथेबाबत कोणतेही अपडेट नसल्याचेही दिग्दर्शकाने म्हटले आहे. तसेच स्क्रिप्टचे लेखन अद्याप सुरू झालेले नाही.

सलमान खानने काही दिवसांपूर्वी घोषणा केली होती की, ‘बजरंगी भाईजान’चा सिक्वेल बनवला जाईल आणि त्याचे नाव ‘पवनपुत्र भाईजान’ असेल. मात्र, चित्रपटाचे नाव अद्याप निश्चित झाले नसल्याचे कबीर खानने सांगितले. सलमान कधीच औपचारिक घोषणा फॉलो करत नाही, पण तो मनापासून बोलतो. आता या सिक्वेलमध्ये हर्षाली मल्होत्रा ​​सलमानसोबत असेल की, नाही हा प्रश्न आहे. याबाबत अद्याप कोणीही माहिती दिलेली नाही.

हेही वाचा :

करिश्मा तन्नाने स्विमिंग पूलमधले बिकिनी फोटो शेअर करत लावली सोशल मीडियावर आग

ऐश्वर्या राय बच्चनपासून ते शिल्पा शेट्टीपर्यंत ‘या’ अभिनेत्रींनी १४ ते २० वर्षांनंतर बॉलिवूडमध्ये केला कमबॅक

जाहिरातींपासून सुरुवात करत टीव्हीची ‘मधुबाला’ ही ओळख मिळवणारी दृष्टी आहे आशियातील मादक महिला

 

हे देखील वाचा