जागतिक हिंदी दिवसानिमित्त अंगूरी भाभी, कटोरी अम्मा आणि रमेश प्रसाद मिश्रा यांनी त्यांच्या खास आणि मनोरंजक क्षणांबद्दल सांगितले आहे. जेव्हा परदेशी लोक त्यांचा हात हिंदीमध्ये आजमावत होते, तेव्हा त्यांनी त्यांना पूर्णपणे आश्चर्यचकित केले. त्यांनी हा किस्सा चाहत्यांबरोबर शेअर केला आहे.
शुभांगी अत्रे
‘भाबीजी घर पर हैं’ ची भाभी शुभांगी अत्रे उर्फ अंगूरी म्हणाली की, “असे अनेकवेळा घडले आहे, जेव्हा मी भारताबाहेर गेले आणि लोकांनी मला ओळखले आणि ‘नमस्ते अंगूरी भाबी’ म्हणत माझे स्वागत केले. एकदा एक स्त्री माझ्याकडे आली आणि तिने तिच्या अनोख्या स्वरात अंगूरी भाबीचे कॅचफ्रेज ‘सही पकडे है!’ म्हणायचा प्रयत्न केला. तो इतका सुंदर क्षण होता की, मी तिला मिठी मारली. मला खात्री आहे की, आमचे टेलिव्हिजन शो जगभर पाहिले जातात आणि हिंदीला जगभरात लोकप्रिय करण्यात महत्त्वाची भूमिका बजावतात.”
हिमानी शिवपुरी
‘हप्पू की उल्टान पलटन’मध्ये कटोरी अम्माची भूमिका साकारणाऱ्या हिमानी शिवपुरी म्हणाल्या की, “हिंदी ही एक सुंदर भारतीय भाषा आहे आणि मला ती लहानपणापासूनच आवडते कारण माझे वडील डॉ. भट्ट यांनी दून स्कूलमध्ये हिंदी आणि संस्कृतचा अभ्यास केला होता. ते शिक्षक होते. या इंडस्ट्रीत काम केल्यामुळे आणि वेगवेगळ्या उच्चारांमध्ये आणि बोलींमध्ये हिंदी बोलण्याचा प्रयत्न केल्याने या भाषेबद्दल माझे प्रेम आणखी वाढले.”
“सध्या, माझ्या ‘कटोरी अम्मा की कानपुरिया’ हिंदीने मला भारतात आणि परदेशात लोकप्रिय केले आहे. मला आठवते की, मी एकदा एका परदेशी तरुणाला भेटले होते. तो माझ्याकडे आला आणि त्याने काहीतरी बोलण्याचा प्रयत्न केला. परंतु कोणालाही त्याचा मुद्दा समजू शकला नाही. पण त्याने अजून थोडा प्रयत्न केल्यावर मला समजले की, तो ‘नींबू निचोड़ देंगे’ म्हणायचा प्रयत्न करत आहे. मला त्याच्या प्रयत्नांचे आणि हिंदी कॅचफ्रेजवरील प्रेमाचे कौतुक करायला आवडेल. हिंदीने जगभर आपला ठसा उमटवला आहे आणि हिंदी शो आणि बॉलिवूड चित्रपटांचे डायलॉग अधिक लोकप्रिय होत आहेत.”
अंबरीश बॉबी
अँडटीव्हीच्या ‘और भाई क्या चल रहा है?’चे अंबरीश बॉबी उर्फ रमेश प्रसाद मिश्रा म्हणाले की, “आमच्या शोच्या एका कथेत, आमच्याकडे युरोपियन बेले डान्सर एजिजा खमरेवा सँड्राची भूमिका करत होती. तिच्यासोबत काम करण्याचा अनुभव अनोखा होता, पण आम्हाला सेटवर तिला हिंदी शिकवताना खूप मजा आली. ती हिंदी शिकायला खूप उत्सुकता होती आणि नमस्ते, मसाला, दोस्त, मस्त इत्यादी काही लोकप्रिय हिंदी शब्दही ती पटकन शिकली. तिने सर्वांना हिंदीत अभिवादन करण्यास सुरुवात केली आणि सर्वांनी तिच्या फिरंगी स्वराचा आनंद घेतला. तिला हिंदी शिकवणे हा आमच्यासाठी एक अद्भुत अनुभव, तर होताच, पण तिची हिंदीबद्दलची आवड आणि आमची भाषा शिकण्याचा तिचा रोमांच पाहून आम्हाला खूप आनंद झाला.” हिंदी भाषेची आवड ही केवळ भारतीयांमध्येच नाही, तर परदेशी लोकांमध्येही पाहायला मिळत आहे.
हेही वाचा :