Thursday, March 28, 2024

अर्जुन कपूरने शेअर केलेल्या ‘या’ गोष्टीला अनुष्का शर्माने दिली पूर्ण सहमती

बॉलिवूवडमधील हँडसम अभिनेता म्हणून ओळखला जाणारा अर्जुन कपूर सध्या त्याच्या चित्रपटांपेक्षा अधिक वैयक्तिक आयुष्यामुळे जास्त चर्चेत असतो. सोशल मीडिया पोस्ट आणि सार्वजनिक ठिकाणची उपस्थिती यामुळे तो सतत मीडियाच्या प्रकाशझोतात येत असतो. सध्या अर्जुन कपूर त्याच्या सोशल मीडियावरील एका हटके पोस्टमुळे चर्चेत आला आहे. अर्जुनने त्याच्या इंस्टाग्राम स्टोरीवर एक पोस्ट शेअर केली आहे जी सध्या खूपच गाजत असून, कलाकारही त्यावर कमेंट्स करत आहे.

अर्जुनने स्वतःला प्रेरित करणे आणि कामासाठी प्रोत्साहित करणे या दोन गोष्टींमधील अंतरावर एक उदाहरण शेअर केले आहे. त्याच्या या पोस्टवर अनुष्का शर्माने देखील प्रतिक्रिया दिली असून, अर्जुनने अमेरिकन लेखक ऍडम ग्रांटचे काही कोट असलेला फोटो पोस्ट केला आहे. यामध्ये स्वतःला प्रोत्साहित करणे आणि कामाला प्रोत्साहित करणे यातील फरक सांगितला आहे. “लक्ष वेधून घेण्याच्या प्रयत्नात तुम्ही जे काही मिळवता त्याचे प्रदर्शन करणे म्हणजे स्वतःला प्रोत्साहित करणे. ‘मी अद्भुत आहे’ योगदान देण्याच्या प्रयत्नात आपण जे काही मिळवतो, त्याला सांगणे म्हणजे कामाला प्रोत्साहन देणे आहे. मला असे वाटते की, याला किंमत आहे.” हे पोस्ट करताना त्याने कॅप्शनमध्ये लिहिले, “जर आपल्या देशात बहुतकरून लोकं यातला फरक समजतील तर आपण अधिक चांगले सिनेमे बनवू शकतो.”

अभिनेत्री अनुष्का शर्माने अर्जुनच्या या पोस्टवर सहमती दाखवत त्याची पोस्ट रिपोस्ट देखील केली आहे आणि त्याला १०० टक्के खरे म्हटले आहे. अर्जुन कपूरने २०१२ साली ‘इश्कजादे’ सिनेमातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. याआधी त्याने ‘कल हो ना हो’ आणि ‘सलाम ए इश्क’ सिनेमासाठी निखिल अडवाणीसोबत सहाय्यक दिग्दर्शन म्हणून काम केले. अर्जुन कपूर शेवटचा पवन कृपलानी यांच्या हॉरर-कॉमेडी ‘भूतपोलिस’मध्ये दिसला होता. तिच्यासोबत सिनेमात सैफ अली खान, जॅकलिन फर्नांडिस आणि यामी गौतम होते.

हेही वाचा :

हे देखील वाचा