चित्रपट निर्माते अनुराग कश्यप (Anurag Kashyap) यांनी ‘घोटाळेबाज’ म्हणत, रविवारी (१६ जानेवारी) त्यांच्या इंस्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली. या पोस्टमध्ये त्यांनी ‘सेक्रेड गेम्स’च्या पुढच्या सीझनच्या बनावट कास्टिंग कॉलबद्दल खुलासा केला आहे. ही पोस्ट शेअर करत अनुराग यांनी लिहिले की, ते हे अकाऊंट चालवणाऱ्या व्यक्तीविरुद्ध एफआयआर नोंदवणार आहे, त्यानंतर या व्यक्तीने लगेच त्याचे अकाऊंट निष्क्रिय केले.
‘सेक्रेड गेम्स’च्या तिसर्या सिक्वलचे खंडन करताना, अनुराग यांनी पोस्ट शेअर केली आणि लिहिले, “हा माणूस राजबीर-कास्टिंग एक घोटाळा करणारा आहे. कृपया रिपोर्ट करा. सेक्रेड गेम्सचा तिसरा भाग येत नाही. मी या माणसाविरुद्ध एफआयआर दाखल करेन.” त्यांच्या इंस्टाग्राम स्टोरीमध्येही ही पोस्ट शेअर करत त्यांनी लिहिले की, “कृपया या घोटाळ्यापासून सावध रहा, सेक्रेड गेम्सचा तिसरा सीझन येत नाहीये.” (film maker anurag kashyap refuted the rumours of sacred games 3)
अनुराग कश्यपने केलं होतं ‘सेक्रेड गेम्स’चं दिग्दर्शन
‘सेक्रेड गेम्स’ ही अनुराग कश्यप, विक्रमादित्य मोटवानी आणि नीरज घायवान यांनी दिग्दर्शित केलेली क्राईम थ्रिलर सीरिज आहे. या शोची निर्मिती फँटम फिल्म्सने केली होती, ज्यामध्ये अनुराग आणि विक्रमादित्य यांचा रिलायन्स एंटरटेनमेंटसह भाग आहे.
या सीरिजमध्ये सैफ अली खान, नवाजुद्दीन सिद्दीकी, राधिका आपटे, गिरीश कुलकर्णी, नीरज काबी आणि जितेंद्र जोशी यांच्या प्रमुख भूमिका होत्या. यात राजश्री देशपांडे, करण वाही, सुखमणी सदना, आमिर बशीर, जतीन सरना, एलनाज नोरोझी, पंकज त्रिपाठी, अमेय वाघ, कुब्रा सैत, सुरवीन चावला, कल्की केकला, रणवीर शौरी आणि अमृता सुभाष यांनीही भूमिका केल्या होत्या. ‘सेक्रेड गेम्स’चा पहिला सीझन जुलै २०१८ मध्ये ८ भागांसह आला होता. त्याचा दुसरा सीझन ऑगस्ट २०१९ मध्ये आला. आता चाहते त्याच्या तिसऱ्या सीझनची बऱ्याच दिवसांपासून वाट पाहत आहेत.
हेही वाचा :