Thursday, December 12, 2024
[aioseo_breadcrumbs]

नादच खुळा! ‘माझी तुझी रेशीमगाठ’ मालिकेच्या सेटवर कलाकार ‘अशा’प्रकारे करतात मस्ती, व्हिडिओ पाहिला का?

दाक्षिणात्य सुपरस्टार अल्लू अर्जुनच्या ‘पुष्पा’ चित्रपटाने संपूर्ण देशात नाव कमावले आहे. अनेक भाषांमध्ये हा चित्रपट प्रदर्शित झाला आहे. चित्रपटातील सगळी गाणी, डायलॉग प्रेक्षकांना खास आवडले आहेत. तसेच अल्लू अर्जुनचा लूक देखील सगळ्यांना आवडला आहे. हा चित्रपट हिंदीत देखील प्रदर्शित झाला आहे. अल्लू अर्जुनच्या पुष्पराज या पात्राला हिंदीमध्ये अभिनेता श्रेयस तळपदेने त्याचा आवाज दिला आहे. त्यामुळे त्याचे देखील सर्वत्र कौतुक चालू आहे.

श्रेयस तळपदे (Shreyash Talpade) सध्या झी मराठीवरील ‘माझी तुझी रेशीमगाठ’ या मालिकेत काम करत आहे. अशातच मालिकेच्या सेटवरून एक व्हिडिओ समोर आला आहे. या व्हिडिओमध्ये आपण पाहू शकतो की, श्रेयसच्या सीनची तयारी चालू आहे. त्याचा मेकअप तसेच बाकी सगळ्या गोष्टी दिसत आहेत. या व्हिडिओच्या बॅकग्राउंडला अल्लू अर्जुनच्या (Allu arjun) ‘पुष्पा’ चित्रपटातील ‘ए बिद्दा ए मेरा अड्डा’, हे गाणे लागले आहे. तसेच मधे संकर्षण कऱ्हाडे आणि श्रेयस तळपदे गाण्यावर डान्स करताना दिसत आहेत. (Shreyash talpade share a video from majhi tujhi reshimgath )

त्यांचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होताना दिसत आहे. व्हिडिओमधून आपल्याला त्यांच्या सेटवर होणारी गंमत- जंमत देखील पाहायला मिळत आहे.

श्रेयससोबत ‘माझी तुझी रेशीमगाठ’ या मालिकेत अभिनेत्री प्रार्थना बेहेरे मुख्य भूमिकेत आहे. त्यांची जोडी प्रेक्षकांना खूप आवडत आहे. तसेच मालिकेत मायरा वैकुळ बालकलाकार आहे. तिच्या निरागस अभिनयाने तर आख्ख्या महाराष्ट्राचे लक्ष वेधून घेतले आहे. एका वेगळ्या विषयावर असलेल्या या मालिकेने प्रोमो पासूनच प्रेक्षकांची मने जिंकून घेतली आहे.

श्रेयसच्या चित्रपटाबद्दल बोलायचं झालं, तर तो ‘वेलकम टू बजरंगपूर’ आणि ‘गोलमाल ५’ या आगामी चित्रपटांमध्ये झळकणार आहे.

हेही  वाचा :

हे देखील वाचा