अभिनेत्री शहनाझ गिल ही सिद्धार्थ शुक्लाच्या मृत्यूनंतर अगदी सदम्यात गेली होती. सोशल मीडिया, शूटिंग या सगळ्यापासून ती दूर गेली होती. परंतु आता कुठे तिचे पाहिल्यासारखे निखळ आणि निरागस रूप समोर येत आहे. अशातच संगीतकार यशराज मुखाटेनी आपल्या अधिकृत इंस्टाग्राम अकाउंटवर शहनाझ गिलबरोबर एक व्हिडिओ शेअर केला. हा व्हिडिओ बघून तुम्हाला देखील हसायला येईल. या दोघांची जोडी चाहत्यांना फार भावली आहे.
यशराजने शेअर केलेल्या या व्हिडिओमध्ये ‘बिग बॉस १३’ मधील काही मजेदार व्हिडिओ एकत्र करून त्याला म्युझिकल टच दिला आहे. व्हिडिओ फार मजेशीर बनला आहे. व्हिडिओमध्ये यश ढोलकी आणि गिटार वाजवताना दिसत आहे, तर शहनाज ‘सच्च ए बोरिंग डे, सच्च ए बोरिंग पीपल.’ असे म्हणते आणि जेव्हा शहनाझ म्हणते “मत करो मेरे सें प्यार, कोई बात नही.” त्यावर आरती सिंग तिला उत्तर देते कि, “पका रही हे में जा रही हू बाहर!” (shehnaaz gill and yasraj mukhate video viral on social media)
या व्हिडिओमध्ये यश स्वतः डान्स करताना शहनाजबरोबर दिसत आहे. यशराजचा चाहत्या वर्गाला हा व्हिडिओ फार पसंत पडला आहे. यशराज मुखाटेने हा व्हिडिओ आपल्या अधिकृत इंस्टाग्राम अकाऊंटवर टाकताना कॅप्शन दिले आहे की, “बोरिंग डे, अमेजिंग शहनाज लव योर एक्सप्रेशन.”
या दोघांच्या चाहत्या वर्गाबरोबरच अनेक सेलिब्रिटींना हा व्हिडिओ आवडला आहे. फेमस कॉमेडियन तन्मय भट त्यांनी कमेंटमध्ये लिहिलं की, “अर्चना पुरन सिंग आधीच हसली आहे त्यामुळे मला हसण्याची गरज नाही. ” यासोबतच मुसिकल आर्टिस्ट शोभित म्हणाला की, “लॉकडाऊन आहे बाहेर जाऊन मरू देखील शकत नाही. त्यांचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे.
हेही वाचा :










