Sunday, July 14, 2024

तेजस्विनी पंडीतला ‘या’ कारणामुळे आई घराबाहेर काढण्याची वाटते भीती, सोशल मीडियावर सांगितले कारण

आपल्याला नेहमीच कलाकार आणि त्यांच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल आकर्षक असते. कलाकार आणि फॅन्स यांच्यातला मुख्य दुवा म्हणून सोशल मीडिया काम करते. या सोशल मीडियावर कलाकार देखील खूप सक्रिय असतात. त्यांना नेहमीच फॅन्स सोशल मीडियावर विविध प्रश्न विचारत असतात. मात्र प्रत्येक प्रश्नाला त्यांना उत्तर देता येईलच असे नाही. यासाठी कलाकार इंस्टाग्रामवरील ‘Ask me a Question’ या सेगमेंटमध्ये ते फॅन्सच्या प्रश्नांना उत्तर देतात. हे सेगमेंट जवळपास सर्वच कलाकार त्यांच्या फॅन्ससोबत करताना दिसतात. हे सेगमेंट नुकतेच मराठी इंडस्ट्रीमधील आघाडीची अभिनेत्री असलेल्या तेजस्विनी पंडितने तिच्या इंस्टाग्रामवरील फॅन्ससोबत केले.

मराठी मनोरंजनविश्वातील गुलाबाची कळी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या तेजस्विनी पंडितला तुफान फॅन फॉलोविंग आहे. तिचा प्रभावी आणि जिवंत अभिनय, तिचे आकर्षक व्यक्तिमत्व, सौंदर्य आदी अनेक गोष्टी प्रेक्षकांना तिची दखल घेण्यासाठी भाग पडतात. एक उत्तम अभिनेत्रीसोबतच यशस्वी उद्योजिका असणाऱ्या तेजस्विनीची तब्बल एक मिलियनची इन्स्टावर फॅन फॉलोविंग आहे. हे सर्व तेजस्विनीबद्दल अनेकदा जाणून घेण्यासाठी प्रयत्न करताना दिसतात. त्यांची ही इच्छा जाणून घेऊन तेजस्विनीने तिच्या फॅन्ससाठी इंस्टाग्रामवर तिला कोणताही एक प्रश्न विचारण्याची संधी दिली होती.

Photo Courtesy: Instagram/tejaswini_pandit

या संधीचा फायदा तिच्या बऱ्याच फॅन्सने घेतला आणि तिला त्यांच्या मनातील अनेक प्रश्न विचारले. एकाने तिला सांगितले की, “ताई तू नोज पिन घालणं खूपच क्युट दिसते.” यावर तेजस्विनीने उत्तर दिले, “विश्वास ठेव मला पण नाक टोचायची इच्छा आहे, पण मी असे केले तर आई मला घराबाहेर काढेल.” यासोबतच तिने हसण्याचे ईमोजी देखील पोस्ट केले आहे. तसे तिने ही पोस्ट विनोदात्मक पद्धतीने लिहिली असून, तिला तिची आईची भीती वाटते मात्र तिची आई तिला घराबाहेर काढेल हे तिने व्यंगात्मक पद्धतीने म्हटले आहे.

तेजस्विनी मराठीमधील लोकप्रिय अभिनेत्री असून, तिने २००४ साली तिने केदार शिंदे यांच्या ‘अगंबाई अरेच्चा’ सिनेमातून मनोरंजनविश्वात पदार्पण केले. त्यानंतर तिने ‘गैर’, ‘मी सिंधुताई सपकाळ’, ‘एक तारा’, ‘तू ही रे’, ‘ये रे ये रे पैसा’ आदी अनेक चित्रपटांमध्ये काम केले तर ‘लज्जा’, ‘एकाच या जन्मी जणू’, ‘१०० डेज’ आदी अनेक हिट मालिका दिल्या आहेत. नुकतीच तेजस्विनीची प्लॅनेट मराठीवर ‘अनुराधा’ नावाची वेबसिरीज प्रसिद्ध झाली असून, तिला प्रेक्षकांचा भरभरु प्रतिसाद मिळत आहे.

हेही वाचा :

हे देखील वाचा