Friday, December 6, 2024
Home बॉलीवूड अर्रर्र, आता कसं करायचं! मौनीच्या लग्नात पाहुणे मंडळींना एन्ट्रीसाठी करावा लागणार खटाटोप, ठेवलीय ‘ही’ अट

अर्रर्र, आता कसं करायचं! मौनीच्या लग्नात पाहुणे मंडळींना एन्ट्रीसाठी करावा लागणार खटाटोप, ठेवलीय ‘ही’ अट

आपल्या स्टाईलने सगळ्यांना वेड लावणारी अभिनेत्री मौनी रॉय आता लाखो चाहत्यांची मने तोडून लग्नगाठ बांधणार आहे. गेल्या वर्षभरापासून मौनीच्या लग्नाच्या बातम्या येत आहेत. मौनीच्या लग्नाला आता अवघे ५ दिवस उरले आहेत. २७ जानेवारीला मौनी तिचा बॉयफ्रेंड सूरज नांबियारसोबत लग्नगाठ बांधणार आहे. आधी असे बोलले जात होते की, मौनी दुबईत लग्नगाठ बांधणार, पण नंतर दोघांनीही लग्नाचे ठिकाण बदलले आणि भारतातच ७ फेरे घेऊन नवीन आयुष्य सुरू करण्याचा निर्णय घेतला. हे दोघेही गोव्यातील वागतोर बीचवर लग्न करणार असल्याचे बोलले जात आहे. त्याचबरोबर आता दोघांच्या लग्नाबाबत एक नवीन अपडेट समोर आले आहे. मौनी आणि सूरजच्या लग्नात पाहुण्यांचा प्रवेश सोपा होणार नाही. कारण वधू-वरांनी पाहुण्यांसमोर एक अट ठेवली आहे, ती पूर्ण केल्यानंतर त्यांना लग्नात प्रवेश मिळेल.

पाहुण्यांना नियमांचे करावे लागणार पालन
मौनी (Mouni Roy) तिच्या लग्नामुळे बऱ्याच दिवसांपासून चर्चेत आहे. तिच्या लग्नाची तयारी जोरात सुरू आहे, पण सध्याची परिस्थिती पाहता मौनी आणि तिचा होणारा पती सूरज यांनी मोठा निर्णय घेतला आहे. कोरोनाची तिसरी लाट आणि वाढत्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लग्नाला येणाऱ्या पाहुण्यांसाठी काही नियम करण्यात आले आहेत. ज्यांचे पालन केल्याशिवाय ते त्यांच्या लग्नात येऊ शकत नाहीत.

आरटी-पीसीआरशिवाय पाहुण्यांना दिला जाणार नाही प्रवेश
कोरोनाची बिघडलेली परिस्थिती पाहता लग्नाला येणाऱ्या पाहुण्यांसाठी विशेष मार्गदर्शक सूचना जारी करण्यात आल्या आहेत. कोव्हिड प्रकरणांमध्ये वाढ होत असल्याचे पाहून अभिनेत्रीने पाहुण्यांच्या यादीतून अनेकांची नावे काढून टाकली आहेत. त्याचबरोबर लग्नाला आलेल्या पाहुण्यांकडून आरटी-पीसीआर रिपोर्टही मागवण्यात आला आहे. हे लग्न मर्यादित पाहुण्यांमध्ये होणार आहे, तर लग्नानंतर तिने टीव्ही आणि बॉलिवूडमधील आपल्या खास मित्रांसाठी मुंबईत रिसेप्शन पार्टीही आयोजित केली आहे.

लग्नसोहळा चालणार आहे दोन दिवस
मौनीच्या लग्नाचा सोहळा दोन दिवस चालणार आहे. २६ तारखेच्या लग्नापूर्वीचे विधी पूर्ण होतील आणि त्यानंतर २७ जानेवारीला मौनी आणि सूरजचे लग्न होणार आहे.

‘ही’ नावे पाहुण्यांच्या यादीत आहेत सामील
पाहुण्यांना लग्नाबाबत गुप्तता पाळण्यासही सांगण्यात आले आहे. करण जोहर, एकता कपूर, मनीष मल्होत्रा ​​आणि आशिका गोराडिया या लग्नाच्या पुष्टी झालेल्या पाहुण्यांच्या यादीत सामील आहेत.

हेही वाचा :

author avatar
Team Bombabomb

हे देखील वाचा