Saturday, April 19, 2025
Home मराठी ‘केळेवाली’ गाण्यावर सोनाली कुलकर्णीने ‘या’ खास व्यक्तीसोबत धरला ठेका, चाहत्याने केली आणखी एक मागणी

‘केळेवाली’ गाण्यावर सोनाली कुलकर्णीने ‘या’ खास व्यक्तीसोबत धरला ठेका, चाहत्याने केली आणखी एक मागणी

‘पांडू’ चित्रपटातील गाण्यांनी आख्ख्या महाराष्ट्राला वेड लावले. खास करून ‘केळेवाली’ हे गाणे गाजले. सोशल मीडियावर तर या गाण्याचा नुसता धुमाकूळ चालला होता. अनेक कलाकारांनी या गाण्यावर व्हिडिओ करून सोशल मीडियावर शेअर केले. चित्रपटात भाऊ कदम, सोनाली कुलकर्णी आणि कुशल बद्रिके यांच्या विनोदाने सगळ्यांना खळखळून हसवले. भाऊ आणि कुशलची जोडी पहिल्यांदा एकत्र मोठ्या पडद्यावर झळकली. त्यामुळे त्यांना प्रेक्षकांचे भरभरून प्रेम मिळाले. चित्रपटातील गाण्यांना देखील खूप चांगला प्रतिसाद मिळाला. अशातच सोनाली कुलकर्णी ‘केळेवाली’ या गाण्यावर एका खास व्यक्तीसोबत डान्स केला आहे.

सोनालीने (sonalee kulkarni) तिची मैत्रीण आणि डान्स कोरीओग्राफर फुलवा फुलवा खामकरसोबत ‘केळेवाली’ या गाण्यावर डान्स केला आहे. दोघींनीही साडी नेसली आहे आणि त्या अत्यंत सुंदर पद्धतीने डान्स करत आहेत. त्या दोघींच्या डान्स व्हिडिओला त्यांच्या चाहत्यांचा नेहमीच खूप चांगला प्रतिसाद मिळत असतो. अशातच त्यांच्या या व्हिडिओला देखील चाहते कमेंट्सचा वर्षाव करून त्यांचे कौतुक करत आहेत. (Sonalee Kulkarni share a dance video with fulva khamkar)

त्यांच्या एका चाहत्याने त्या दोघींकडे ‘बुरूम बुरुम’ या गाण्यावर व्हिडिओ करण्याची देखील मागणी केली आहे. तसेच बाकी अनेकजण या व्हिडिओवर त्यांच्या प्रतिक्रिया देत आहेत. ‘पांडू’ या चित्रपटाने प्रेक्षकांचे खूप मनोरंजन केले आहे.

सोनाली कुलकर्णी ही सध्या जोरदार चर्चेत आहे. एका मागून असे अनेक चित्रपट ती प्रेक्षकांच्या भेटीला घेऊन येत आहे. ‘पांडू’ आधी तिचा ‘झिम्मा’ हा चित्रपट प्रदर्शित झाला होता. या चित्रपटाने देखील खूप नाव कमावले आहे. तसेच ती सध्या बाकी अनेक प्रोजेक्टमध्ये व्यस्त आहे.

हेही वाचा :

 

हे देखील वाचा