Tuesday, July 23, 2024

जन्मापूर्वीच प्रियांका चोप्राला माहिती होतं होणाऱ्या बाळाचं लिंग? मुलाखतीत चुकून केलं होतं उघड

शुक्रवारी (२१ जानेवारी) प्रियांका चोप्रा (Priyanka Chopra) आणि निक जोनास (Nick Jonas) यांनी सरोगसीद्वारे पहिल्या बाळाचा जन्म झाल्याची घोषणा केली. या जोडप्याने त्यांच्या बाळाचे लिंग उघड केले नसले, तरी लेटेस्ट रिपोर्ट सांगतात की ती मुलगी आहे. या माहितीचा वापर करून चाहत्यांनी नुकत्याच रिलीझ झालेल्या ‘द मॅट्रिक्स रिसरेक्शन’च्या प्रमोशनदरम्यानचा प्रियांकाचा एक व्हिडिओ शोधला आहे, ज्यामध्ये ती तिच्या मुलीबद्दल बोलताना दिसत आहे.

वास्तविक, डिसेंबर २०२१ मध्ये एका मुलाखतीत प्रियांकाने तिच्या ‘मुली’बद्दल एक गोष्ट सांगितली होती. आपल्या मुलीने वारसा न मिळण्याची इच्छा व्यक्त करावी, असे तिने सांगितले. मात्र, त्यावेळी प्रियांका तिच्या भावी बाळाला उद्देशून बोलत असल्याचं दिसत होतं. पण आता इंस्टाग्रामवर नेटकऱ्यांचे असे म्हणणे आहे की, प्रियांकाला त्यावेळी बाळाचे लिंग माहित होते आणि म्हणूनच ‘माझी मुलगी’ असे ती म्हटली. (did priyanka chopra tell the gender of her child before birth)

२ आठवड्यांपूर्वी आई बनली प्रियांका
रिपोर्टनुसार, डॉक्टरांनी दिलेल्या तारखेच्या १२ आठवड्यांपूर्वी प्रियांकाच्या मुलीचा जन्म झाला आहे. या जोडप्याच्या मुलीचा जन्म लास वेगासच्या बाहेरील दक्षिण कॅलिफोर्नियातील रुग्णालयात झाला. प्री-मॅच्युअर डिलिव्हरीमुळे बाळ काहीसे अशक्त आहे. यामुळे, निक-प्रियांका यांनी ठरवले आहे की, जोपर्यंत मूल पूर्णपणे निरोगी होत नाही तोपर्यंत ते रुग्णालयातच राहील. बाळाची डिलिव्हरीची तारीख एप्रिलमध्ये असल्याचे बोलले जात होते. यामुळे प्रियांकाने तिच्या कामाच्या सर्व कमिटमेंट्सही पूर्ण केल्या होत्या. जेणेकरून बाळाच्या जन्मानंतर तिला मातृत्वाचा आनंद घेता येईल. बाळाच्या जन्माच्या एक आठवड्यानंतर प्रियांकाने गुडन्यूज चाहत्यांसोबत शेअर केली आहे.

चाहत्यांसोबत शेअर केला आनंद
प्रियांका चोप्रा आणि निक जोनास यांनी इंस्टाग्रामवर एक स्टेटमेंट शेअर केले आहे. ज्यात लिहिले आहे की, “आम्ही सरोगसीद्वारे मुलाचे स्वागत केले आहे. याची पुष्टी करताना आम्हाला खूप आनंद होत आहे. आम्ही आमच्या कुटुंबावर लक्ष केंद्रित करू इच्छित असल्यामुळे, आम्ही आदरपूर्वक या विशेष काळात गोपनीयतेची मागणी करतो. खूप खूप धन्यवाद.” ही पोस्ट सोशल मीडियावर वाऱ्यासारखी व्हायरल होत आहे.

हेही वाचा :

हे देखील वाचा