Thursday, July 18, 2024

‘हे बेबी’मधील अक्षय कुमारची मुलगी एंजल झाली मोठी, फोटो पाहून ओळखणही झालं कठीण

बॉलिवूड विश्वात असे अनेक बालकलाकार आहेत, ज्यांनी कोणताही अभिनय न करता आपल्या क्यूटनेसने प्रेक्षकांच्या मनावर राज्य केले. परंतु हे कलाकार नंतर चित्रपट जगतात दिसले नाहीत. त्यामुळे अशा परिस्थितीत प्रेक्षकांचा त्यांच्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन एक लहान मूल म्हणून कायम असतो. ‘हे बेबी’ चित्रपटातील अक्षय कुमारची (Akshay Kumar) छोटी मुलगी एंजल सर्वांना आठवत असेल. संपूर्ण चित्रपटाची कथा या मुलीवर आधारित होती. छोट्या एंजलच्या सुंदर हास्याने संपूर्ण चित्रपटात प्रेक्षकांची मने जिंकली. एंजलची भूमिका करणारी जुआना सांघवी आता मोठी झाली आहे आणि तिचे फोटो पाहून तिला ओळखणे कठीण आहे. जुआना सांघवीचे लेटेस्ट फोटो पाहून अनेक युजर्स आश्चर्यचकित झाले आहेत.

Photo Courtesy: Social media

‘हे बेबी’ २००७ मध्ये आलेल्या या चित्रपटात अक्षय कुमार आणि विद्या बालनची मुलगी एंजेलच्या भूमिकेत दिसलेली जुआना सांघवी मोठी झाली असून, तिचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. जुआनाचे हे लेटेस्ट फोटो पाहून प्रेक्षक थक्क झाले आहेत. या फोटोंमध्ये जुआनाला पाहिल्यानंतर प्रेक्षक आश्चर्यकारक प्रतिक्रिया देत आहेत आणि विचारत आहेत की, ही तीच मुलगी आहे का? एका युजरने कमेंट करत लिहिले की, “विश्वास बसत नाही,” तर दुसऱ्या युजरने लिहिले की, “ती तीच मुलगी आहे, ती कधी इतकी मोठी झाली आहे.”

Photo Courtesy: Social media

‘हे बेबी’ चित्रपट आला तेव्हा एंजल म्हणजेच जुआना संघवी फक्त १६ महिन्यांची होती, आता जुआना १७ वर्षांची झाली आहे. तिच्या लेटेस्ट फोटोंमध्ये जुआना गर्ल गँगसोबत दिसत आहे. तिचे नवीन फोटो एका सोशल मीडियाच्या इंस्टाग्राम अकाऊंटवर शेअर केले आहेत.

हे बेबी चित्रपटात तिने आपल्या गोंडस हास्याने प्रेक्षकांना थक्क केल्यानंतर जुआना कुठेच दिसली नाही. मात्र, ती कोणत्या प्रोजेक्टमध्ये दिसणार की, नाही हे अद्याप सांगता येणार नाही.

हेही वाचा :

हे देखील वाचा