Monday, August 4, 2025
Home कॅलेंडर Happy Birthday: ‘क्राईम पेट्रोल’ फेम अनुप सोनीच्या आयुष्याची कथा आहे खूपच रंजक, एक नजर टाकाच

Happy Birthday: ‘क्राईम पेट्रोल’ फेम अनुप सोनीच्या आयुष्याची कथा आहे खूपच रंजक, एक नजर टाकाच

‘सावधान रहे सतर्क रहे’ म्हणत घराघरात पोहोचलेले लोकप्रिय अभिनेते म्हणजे अनुप सोनी (Anup Soni). अनुप सोनी यांच्यामुळेच हा शो प्रचंड लोकप्रिय ठरला आहे. मात्र त्यांनी या शोमधून नव्हे, तर चित्रपटातून आपल्या अभिनय क्षेत्राला प्रारंभ केला होता. रविवारी (३० जानेवारी) अनुप सोनी यांचा ४७वा वाढदिवस आहे. जाणून घेऊया त्यांच्याबद्दल खास गोष्टी…

अनुप सोनी हे टीव्ही मालिकांमधील लोकप्रिय अभिनेते आहेत. त्यांच्या भारदस्त आवाजाचे अनेकजण फॅन आहेत. अनुप यांनी फक्त मालिकांमध्ये नाही, तर अनेक चित्रपटातही काम केले आहे. त्यांचा जन्म ३० जानेवारी १९७५ला लुधियानामध्ये झाला. त्यांनी ‘क्राइम पेट्रोल’ ते ‘बालिका वधू’सारख्या अनेक लोकप्रिय कार्यक्रमात आपल्या अभिनयाची छाप पाडली आहे. त्यांच्या ‘क्राइम पेट्रोल’ या शोने प्रचंड लोकप्रियता मिळवली होती. या शोसाठी त्यांचे इतके चाहते होते की, त्यांनी हा शो सोडल्यानंतर त्यांना पुन्हा बोलावण्याची मागणीही चाहत्यांकडून झाली होती.

मात्र अनुप सोनी यांनी आपल्या अभिनय कारकिर्दीला सुरुवात चित्रपटांतून केली होती. परंतु यामध्ये त्यांना यश मिळाले नाही. १९९९मध्ये आलेला ‘गॉडफादर’ हा त्यांचा पहिला चित्रपट होता. यानंतर त्यांनी ‘फिजा’, ‘खुशी’, ‘शीन’, आणि ‘कर्कश’सारख्या गाजलेल्या चित्रपटात काम केले. मात्र त्यांना यामध्ये अपयशाचा सामना करावा लागला, त्यामुळे त्यांनी आपला मोर्चा टीव्ही मालिकांकडे वळवला. त्यामध्ये त्यांनी ‘सीआयडी’, ‘बालिका वधू’ सारखे अनेक लोकप्रिय कार्यक्रम केले.

अनुप सोनी यांच्या अभिनयाइतकीच त्यांच्या वैवाहिक आयुष्याची कथासुद्धा खूपच रंजक आहे. त्यांचे पहिले लग्न ऋतू सोनी यांच्याशी झाले होते. पुण्यामध्ये मॅनेजमेंटची पदवी घेतलेल्या ऋतू सध्या एक सॉफ्टवेअर कंपनी चालवितात. एका कार्यक्रमात बोलताना ऋतू सोनी यांनी अनुप यांच्याबद्दल एक धक्कादायक खुलासा केला होता. यावेळी त्यांनी सांगितले की, लग्नाच्या ६ वर्षानंतर त्यांना अनुप यांच्या मोबाईलमधून प्रेम प्रकरणाची माहिती समजली. त्यांचे हे प्रकरण चक्क राज बब्बरची मुलगी जुही बब्बरशी असल्याची माहिती समोर आली होती. याबद्दल त्यांनी अनुप सोनी यांना विचारले असता त्यांनी यावर नकार दिला. शेवटी दोघांचाही २०१० मध्ये घटस्फोट झाला.

ऋतू सोनी यांच्याशी घटस्फोट घेतल्यानंतर अनुप सोनी यांनी २०१२ मध्ये जुही बब्बरशी विवाह केला. दरम्यान तिचेही आधीच एक लग्न झाले होते.

हेही वाचा :

हे देखील वाचा