Saturday, September 26, 2026
Home › अन्य › बिग बॉस हरल्यानंतर करण कुंद्राने व्यक्त केली त्याच्या मनातील खंत, म्हणाला ‘जे झालं त्यातून सावरायला मला…’

बिग बॉस हरल्यानंतर करण कुंद्राने व्यक्त केली त्याच्या मनातील खंत, म्हणाला ‘जे झालं त्यातून सावरायला मला…’

बिग बॉसचा आणखी एक सीझन पूर्ण झाला. रविवारी (३० जानेवारी) बिग बॉस १५ चा ग्रँड फिनाले झाला. त्याचवेळी बिग बॉस १५ ट्रॉफीवर शोची बबली मेंबर असलेल्या तेजस्वी प्रकाशने आपले नाव कोरले. प्रतीक सहजपाल फर्स्ट रनअप ठरला, तर करण कुंद्रा पहिल्या ३ मध्ये राहिला. करणला पूर्ण आशा होती की, तो बिग बॉस ट्रॉफी जिंकेल, परंतु मतांच्या कमतरतेमुळे त्याला टॉप २ मधून बाहेर पडावे लागले. ‘बिग बॉस १५’ची ट्रॉफी जिंकल्यानंतर तेजस्वी प्रकाशने कुटुंब आणि चाहत्यांचे तसेच करण कुंद्राचे आभार मानले. पण पराभवाचे दुःख करणच्या डोळ्यात स्पष्ट दिसत होते.

सोमवारी (३१ जानेवारी) सकाळी करणने ट्विटरवर आपली व्यथा मांडली. त्याने लिहिले की, “माझ्या प्रवासात तुम्ही सर्वांनी माझ्यावर केलेल्या प्रेमाबद्दल तुम्हा सर्वांचे खूप खूप आभार. उशीरा ट्वीट केल्याबद्दल क्षमस्व. आज माझा बर्‍याच गोष्टींवरील विश्वास उडाला आहे, परंतु आशा आहे की, स्वतःवर नाही.” 

करणने पुढे लिहिले की, “तुम्ही माझ्या पाठीशी खडकाप्रमाणे उभे राहिलात. जे घडले त्यातून सावरण्यासाठी मला वेळ लागू शकतो, परंतु मी तुम्हाला खात्री देतो की, मी करेन आणि मी तुम्हाला वचन देतो की, मी तुम्हाला निराश करणार नाही. आता पुन्हा कधीच नाही, तुम्हा सर्वांचे खूप खूप आभार!” करणच्या या ट्विटवर त्याच्या चाहत्यांनी उत्स्फूर्त प्रतिक्रिया दिल्या आहेत. काही चाहत्यांनी त्याला खरा विजेता देखील म्हटले आहे. त्याचबरोबर काही लोकांनी बिग बॉसच्या शोला पक्षपाती म्हटले आहे.

करण कुंद्राने आपल्या करिअरची सुरुवात टीव्ही इंडस्ट्रीतून केली होती. त्याचा पहिला शो ‘कितनी मोहब्बत है’ सुपरहिट ठरला. करण ‘कितनी मोहब्बत है’, ‘जरा नचके देखा’, ‘बेताब दिल की तमन्ना’ यांसारख्या अनेक मालिकांमध्ये दिसला आहे. तो ‘रोडीज’मध्ये दिसला आहे.

हेही वाचा :

हे देखील वाचा