बॉलिवूड इंडस्ट्रीबदल आपण नेहमीच वाचत असतो की, मोठमोठे कलाकार आपल्या शरीराची सर्जरी करत असतात. परंतु त्याव्यतिरिक्त बॉलिवूड पासून ते हॉलिवूडपर्यंत सतत काही ना काही ट्रेंड येत असतात. त्याचप्रमाणे आजकाल बॉलिवूड कलाकारांच्या शरीराच्या अवयवांच्या विम्याशी निगडित एक ट्रेंड्स आला आहे. अनेक आंतराष्ट्रीय आणि बॉलिवूड कलाकारांनी त्यांच्या शरीराच्या अवयवांचा विमा केला आहे. यामध्ये देसी गर्ल प्रियांका चोप्रा, सनी देओल, अमिताभ बच्चन ते जॉन अब्राहम यासारख्या कलाकारांची नावे आहेत.
प्रियांका चोप्रा (Priyanka Chopra)
देसी गर्ल प्रियांका चोप्रा हिच्या शस्त्रक्रियेबद्दल सर्वांनाचं माहिती आहे. परंतु तुम्हाला कदाचित हे माहित नसेल की, प्रियांका चोप्राने तिचे स्माईल कॉपीराईट करून घेतली आहे. शस्त्रक्रिया करून जर एखादा प्रियांकासारखा हसत असेल, तर त्याला मोठी किंमत मोजावी लागू शकते.
अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan)
बॉलिवूड इंडस्ट्रीमध्ये ‘अँग्री यंग मॅन’ म्हणून ओळखले जाणारे अभिनेता म्हणजे अमिताभ बच्चन. आपल्या अभिनयाने आणि दमदार आवाजने त्यांनी प्रेक्षकांचं मन जिंकलं. त्यांना त्यांच्या अभिनयपेक्षा त्यांच्या आवाजामुळे जास्त ओळख मिळाली. इंडस्ट्रीमध्ये सगळ्यात वेगळा आणि जबरदस्त आवाज त्यांचा आहे. गुटख्यासारखा धुम्रपानाला प्रोत्साहन देण्यासाठी त्यांच्या आवाजाचा गैरवापर होत होता. त्यांनी या घटनेला अनैतिक सांगत म्हटले की, “मी धूम्रपान करत नाही आणि त्याचा प्रचारही करत नाही.” यानंतर बिग बींनी त्यांच्या आवाजाचा गैरवापर होऊ नये म्हणून त्यांच्या आवाजाचे कॉपीराईट केले.
जेनिफर लोपेझ (Jennifer Lopez)
हॉलिवूडची लोकप्रिय अभिनेत्री जेनिफर लोपेझने नितंबांचा (Hips) विमा केल्याचा दावा केला जात आहे. ज्यासाठी तिने मोठी रक्कम खर्च केली होती.
जॉन अब्राहम (John Abraham)
जॉन अब्राहम हा लोकप्रिय अभिनेता आहे. जॉनने त्याच्या करिअरची सुरुवात ही मॉडेलिंगपासून केली होती. तो त्याच्या आकर्षक शरीरासाठी ओळखला जातो. जॉन अब्राहमने ‘दोस्ताना’ या चित्रपटातील गाण्यांदरम्यान त्याच्या नितंब फ्लॉन्ट करत प्रसिद्धीच्या झोतात आला होता. या चित्रपटानंतर जॉनला आपल्या शरीराचा हा भाग किती मौल्यवान आहे याची जाणीव झाली. माध्यमांच्या रिपोर्ट्सनुसार, जॉन अब्राहमने यासाठी १० कोटी रुपय खर्च केले आहेत.
मल्लिका शेरावत (Mallika Sherawat)
आपल्या बोल्ड स्टाईलसाठी प्रसिद्ध असलेली मल्लिका शेरावत हिचाही या यादीत समावेश आहे. जिने तिच्या संपूर्ण शरीराचा विमा केला आहे. तिचं म्हणणं असं आहे की, शरीर टिकवण्यासाठी खूप वेळ आणि मेहनत घ्यावी लागते, त्यामुळे अशा परिस्थितीत आपल्या शरीराचा विमा काढून काळजी घेणे खूप आवश्यक आहे.
लता मंगेशकर (Lata Mangeshkar)
गाण कोकिळा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या लता मंगेशकर यांनी विविध भाषांमध्ये ५०००० हुन अधिक गाणी गायली आहेत. गायिकेने त्यांच्या मधुर आवाजाचा विमा केला आहे.
सनी देओल (Sunny Deol)
सनी देओल त्याच्या संवाद आणि दमदार आवाजासाठी खूप लोकप्रिय आहे. आपल्या दमदार शैलीमुळे त्याने आपल्या चित्रपटांमध्ये एक ठसा उमटवला आहे. कॉपी करण्याच्या बहाण्याने मर्यादा ओलांडणाऱ्यामुळे सनी देओलने त्याच्या आवाजाचा आणि संवादाचा विमा केला आहे.
रिहाना (Rihanna)
जगभरात रिहानाचे लाखो चाहते आहेत. भारतातही ती तिच्या खास आवाजामुळे चर्चेत असते. ‘सेलिब्रिटी लेग्स ऑफ ए गॉडेस’ पुरस्कार जिंकणाऱ्या रिहानाने तिच्या शरीराच्या अव्ययांचा विमा केला आहे.
हेही वाचा :