Monday, February 26, 2024

कधीही न विसरता येणारी, लता मंगेशकर यांनी गाजलेली ‘ही’ मराठी गाणी लतादिदींप्रमाणेच राहणार अमर

स्वर कोकिळा, गानसरस्वती लता मंगेशकर यांचे मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात निधन झाले. (Lata Mangeshkar Passes Away) लतादिदींनी १९४२ साली करिअरला सुरुवात केली होती. भारतरत्न आणि भारताच्या गानकोकीळा ठरलेल्या लता मंगेशकर (Lata Mangeshkar) यांची करियरमध्ये अनेक गाणी गायली. दिदींनी आजवर मराठी, हिंदी अशा एकूण वीस भाषांमध्ये विविध प्रकारची गाणी गायली आहेत. (Veteran Singer Lata Mangeshkar Passes Away At Mumbai)

खरं म्हणजे लता मंगेशकर यांनी गायिलेली सर्वच गाणी सुपरहिट झाली आहेत. त्यांच्या गायिकीचा आणि मेहनतीचा सन्मान म्हणून त्यांना भारतरत्न, पद्मविभूषण, पद्मभूषण, दादासाहेब फाळके, राजीव गांधी सद्भावना पुरस्कार यांसह अनेक पुरस्कार मिळाले. या बातमीत आपण लता मंगेशकर यांची गाजलेली काही मराठी गाणी पाहणार आहोत…

हेही वाचा – एका युगाचा अंत…! गानसरस्वती, भारतरत्न लता मंगेशकर यांचे दुःखद निधन, कलाविश्वावर शोककळा

लता मंगेशकर यांची गाजलेली मराठी गाणी… (Lata Mangeshkar Superhit Marathi songs)

१. चिंब पावसाने रान झाले आबादानी

२. ऐरणीच्या देवा तुला

३.मी डोलकर दर्याचा राजा

४. मराठी पाउल पडते पुढे

५. चाफा बोलेनाबाई मन मोराचा

६. मला लागली कुणाची उचकी

७. लेक लाडकी या घरची

८. मेंदीच्या पानावर

९. असा बेभान हा वारा

१०. जयोस्तुते मराठी

११. मळ्याच्या मळयामधी

तब्बल महिन्याभरापासून सुरु होते उपचार…

दिनांक ८ जानेवारी रोजी लता मंगेशकर (Veteran Singer Lata Mangeshkar) यांना कोरोनाची लागण झाल्यानंतर मुंबईमधील ब्रीच कँडी रुग्णालय (Breach Candy Hospital) येथे उपचारार्थ दाखल करण्यात आले होते. तेव्हापासून लतादीदींवर आयसीयूमध्ये उपचार सुरु होते. दरम्यान काही दिवसांनंतर त्या कोरोनातून (Corona) बऱ्या झाल्या होत्या. (Lata Mangeshkar Cororna Positive) तसेच, त्यांची तब्येतही सुधारल्याची माहिती डॉक्टरांकडून देण्यात आली होती. परंतू, कोरोनासह त्यांना न्यूमोनियाचीही लागण झाली होती, ज्यावर उपचार सुरु होते. अन् त्यामुळेच त्यांची तब्येत पुन्हा बिघडली.

दिदींची तब्येत अचानक खालावल्याने डॉक्टरांनी त्यांना शुक्रवारी (५ फेब्रुवारी) आयसीयूमध्ये व्हेंटिलेटरवर (कृत्रिम श्वसन यंत्रणा – Ventilator) ठेवले. ‘लतादिदींची प्रकृती गंभीर असून त्यांना आयसीयूमध्ये ठेवण्यात आले आहे. आणि डॉक्टरांच्या देखरेखीखाली त्यांच्यावर उपचार सुरू आहेत’, अशी माहिती ब्रीच कँडी रुग्णालयाच्या प्रमुख डॉक्टरांनी दिली होती. मात्र, अखेरीस उपचारादरम्यान ९२ वर्षीय भारतरत्न (Bharat Ratna) लता मंगेशकर यांची प्राणज्योत मालवली. (Veteran Singer Bharat Ratna Lata Mangeshkar Passes Away)

हेही वाचा – भारतरत्न लता मंगेशकर यांचे निधन, पंतप्रधान नरेंद्र मोदींना अश्रू अनावर; म्हणाले, ‘दिदी तुम्ही…’

लता मंगेशकर यांचा जीवनप्रवास…

मास्टर दिनानाथ मंगेशकर आणि शेवंती मंगेशकर या दांपत्याच्या घरात इंदौर येथे दिनांक २८ सप्टेंबर १९२९ रोजी लता मंगेशकर यांचा जन्म झाला. अगदी लहान वयापासूनच लतादिदींनी गायकीला सुरुवात केली. पुढे अनेक छोट्या मोठ्या कार्यक्रमातून आणि नंतर बॉलिवूड, मराठी या सिनेक्षेत्रासह अनेक ठिकाणी त्यांनी आपल्या गोड आवाजाने कोट्यवधी श्रोत्यांना मंत्रमुग्ध केले.

अनेक दशके त्यांनी आपल्या मधूर आवाजाने रसिकांची मने जिंकली नव्हे तर त्यांच्या मनावर राज्य केले. लता मंगेशकर यांनी त्यांच्या जीवनात हजारो गाणी गायली, ज्यातील काही गाणी लतादिदींप्रमाणेच अजरामर आहेत. लतादिदींनी अगदी लहानपणापासूनच संगीत हेच आपले आयुष्य बनवले. संगीत, जे कधी आपल्याला हसवते तर कधी आपल्या डोळ्यातून अश्रु आणते. अशा दोन्ही आवाजांची देणगी लता मंगेशकर यांना लाभली होती.

अधिक वाचा –

…म्हणून दिलीप कुमार अन् लता दीदींमध्ये झाले मतभेद, तब्बल ‘इतकी’ वर्षे होता नात्यात अबोला

‘त्या’ व्यक्तीमुळे लता दीदी आयुष्यभर राहिल्या अविवाहित, ‘अशी’ आहे त्यांची अपुरी प्रेमकहाणी

जेव्हा राज कपूर यांनी लता मंगेशकरांना म्हटलं होतं, ‘कुरूप’ मुलगी; मग ‘गानकोकिळे’नंही घेतला होता मोठा निर्णय

हे देखील वाचा