Sunday, November 24, 2024
Home बॉलीवूड शेवटच्या क्षणी लतादीदी होत्या वडिलांच्या आठवणीत, वेंटीलेटर असतानाही मागवली गाण्याची रेकॉर्डिंग

शेवटच्या क्षणी लतादीदी होत्या वडिलांच्या आठवणीत, वेंटीलेटर असतानाही मागवली गाण्याची रेकॉर्डिंग

गानकोकिळा लता मंगेशकर यांचे वयाच्या 92 व्या वर्षी निधन झाले आहे. लता दीदी कोरोना संक्रमित झाल्या होत्या त्यानंतर त्यांना निमोनिया झाला होता. त्यामुळेच गेल्या वर्षी 6 फेब्रुवारी रोजी त्यांचे निधन झाले. त्या त्यांचे वडील दीनानाथ मंगेशकर यांच्या लाडक्या होत्या. त्यामुळेच शेवटच्या क्षणी देखील त्या वडिलांच्या आठवणीत होत्या.

या गोष्टीची माहिती व्हॉईस ओव्हर आर्टिस्ट हरीश भिमानी यांनी त्यांच्या मुलाखतीत दिली. शेवटच्या क्षणी वेंटिलेटरवर असताना देखील त्या त्यांच्या वडिलांची गाणी ऐकत होत्या. त्यासाठी त्यांनी त्यांच्या वडिलांची रेकॉर्डिंग आणि एक इअरफोन हॉस्पिटलमध्ये मागवला होता. (Lata Mangeshkar wa listening to her father song at last moment)

हरीश भीमानी यांनी सांगितले की, “लतादीदी शेवटच्या क्षणी त्यांच्या वडिलांची खूप आठवण काढत होत्या. ते एक नाट्य गायक होते. लता मंगेशकर यांनी हॉस्पिटलमध्ये त्यांच्या वडिलांची गाणी मागवून घेतली होती आणि त्या ऐकत होत्या. ही गाणी ऐकताना त्या पूर्णपणे या गाण्यामध्ये मग्न झाल्या होत्या.

त्यांनी पुढे सांगितले की, “त्या गाणे गाण्यासाठी मास्क काढत होत्या, परंतु डॉक्टर त्यांना पुन्हा पुन्हा असे न करता आराम करण्याचा सल्ला देत होत्या. परंतु या वेळी गाणे ऐकताना देखील त्या त्यांच्या वडिलांशी बोलत होत्या. त्यानंतर त्या अचानक शांत झाल्या आणि काहीच बोलल्या नाहीत.”

लता मंगेशकर यांनी अनेक गाणी ऐकली आहेत. परंतु त्या त्यांची गाणी कधीच ऐकत नाहीत. या गोष्टीची माहिती देखील हरीश भिमानि यांनी त्यांच्या मुलाखतीत दिली होती. त्यांनी सांगितले की, “लता दीदी त्यांची गाणी कधीही ऐकत नाहीत. त्यांना त्यांचे गाणे ऐकायला भीती वाटत होती. त्यांना त्यावेळी असे वाटते की, त्या हे गाणे आणखी चांगले गाऊ शकल्या असत्या.”

लता मंगेशकर जेव्हा 13 वर्षाच्या होत्या तेव्हाच त्यांच्या वडिलांचे निधन झाले. गान कोकिळाचे वडील दीनानाथ मंगेशकर एका कलाकार आणि गायक होते. त्या त्यांच्या वडिलांमुळे या क्षेत्रात आल्या होत्या. त्यांनी खूप कमी वयात गाण्याचा रियाज करण्यास सुरुवात केली होती.

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा
दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा
हेही वाचा-
गायिकी आधीच लतादीदींनी ठेवले होते अभिनयात पाऊल, बोनी कपूर यांच्या ‘या’ चित्रपटात झळकल्या होत्या गानकोकिळा

एकमेकांना भाऊ- बहीण मानणाऱ्या लता मंगेशकर आणि दिलीप कुमारांमध्ये ‘या’ कारणाने आला होता दुरावा, 13 वर्षे…

author avatar
Tejswini Patil

हे देखील वाचा