Friday, March 14, 2025
Home बॉलीवूड ‘बाई अशी का चालतेय, नक्की काय होतंय’, नोरा फतेही ट्रोलर्सच्या निशाण्यावर

‘बाई अशी का चालतेय, नक्की काय होतंय’, नोरा फतेही ट्रोलर्सच्या निशाण्यावर

बॉलिवूड अभिनेत्री आणि डान्सर नोरा फतेही तिच्या डान्समुळे आणि स्टाईलमुळे नेहमीच चर्चेत असते. ती जिथे कुठे जाईल तिथे पॅपराजी तिला स्पॉट करत असतात. यावेळी ती तिच्या चालण्यावरून चर्चेत आली आहे. नोराचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ज्यामुळे अनेकजण तिला ट्रोल करत आहेत.

नोरा फतेहीचा (Nora Fatehi) एक बोल्ड व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये तिने पांढऱ्या रंगाचा शर्ट आणि निळ्या रंगाची टाईट पँट घातली आहे. तसेच तिने एक बॅग घेतली आहे आणि हलकासा मेकअप केला आहे. ती कॅमेरामध्ये पोझ देताना दिसत आहे. (nora fatehi’s video viral on social media)

तिचा हा व्हिडिओ व्हायरल भयानीने शेअर केला आहे. तिच्या या फोटोवर जबरदस्त कमेंट येताना दिसत आहे. तिच्या काही चाहत्यांना तिचा हा लूक आवडला आहे तर काहीजण मात्र तिच्या चाळण्यवरून तिला ट्रोल करत आहेत. तिच्या एका चाहत्याने “ती सरळ का चालत नाही,” अशी कमेंट केली आहे.

नोराने अनेक बॉलिवूड चित्रपटात काम केले आहे. खास म्हणजे तिचा दान देखील अनेकांना आवडतो. अनेक गाण्यांमध्ये तिने डान्स केला आहे. तिच्या डान्सचे बॉलिवूडमध्ये लाखो चाहते आहेत. नोरा सोशल मीडियावर देखील मोठ्या प्रमाणात सक्रिय असते. तिचे हॉट आणि बोल्ड व्हिडिओ अनेकवेळा सोशल मीडियावर व्हायरल होत असतात.

नोरा ही एक उत्कृष्ट डान्सर तसेच अभिनेत्री आहे. तिने अनेक गाण्यांमध्ये डान्स केला आहे. तिच्या ‘दिलबर’ या गाण्याने तर सगळ्या गाण्यांचे रेकॉर्ड तोडून टाकले होते. नंतर ती ‘स्ट्रीट डान्सर ३’ मध्ये देखील दिसली होती. तिने ‘ओ साकी साकी’, ‘कमरीया’, ‘एक तो कम जिंदगानी’ या सुपरहिट गाण्यांवर डान्स केला आहे. तसेच तिचे ‘हाय गर्मी’ हे गाणे लोकप्रिय झाले आहे. ती लवकरच ‘सत्यमेव जयते २’ या चित्रपटात दिसणार आहे. तसेच ती अजय देवगन आणि सोनाक्षी सिन्हासोबत ‘भुज : द प्राइड ऑफ इंडिया’ या चित्रपटात देखील दिसली आहे. नुकतेच तिचे कुसु कुसू हे गाणे प्रदर्शित झाले आहे.

हेही वाचा :

हे देखील वाचा