बॉलिवूड अभिनेत्री क्रिती सेनने बॉलिवूडमध्ये तिचं एक वेगळच स्थान निर्माण केल आहे. अगदी कमी काळात क्रितीने हटके भूमिका साकारत प्रेक्षकांची पसंती मिळवली आहे. क्रितीने तिच्या जबरदस्त लूक्स आणि उत्कृष्ट अभिनयामुळे चाहत्यांच्या मनात एक विशेष स्थान मिळवले आहे. या अभिनेत्रीची गणना बॉलिवूडमधील टॉप अभिनेत्रींमध्ये केली जाते. ती केवळ अभिनयातच नाही, तर डान्समध्येही पारंगत आहे. ती यशाची शिडी चढत आहेत. ती बी-टाऊनमधील सर्वात व्यस्त अभिनेत्रींपैकी एक आहे. ती अनेक प्रोजेक्टचा एक भाग आहे.
क्रितीला (Kriti Senon) सोशल मीडियावर लाखो युजर्स फॉलो करतात. तिला इंस्टाग्रामवर वेळ घालवायलाही आवडते. येथे ती तिच्या आगामी प्रोजेक्ट्सबद्दल चाहत्यांना सांगत असते. तिने नुकताच आता इंस्टाग्रामवर ‘जब वी मेट’ चित्रपटातील ‘तुम से ही’ गाणे गाताना एक व्हिडिओ शेअर केला आहे.
क्रिती सेननने अमर कौशिकसोबत गायले गाणे
व्हिडिओमध्ये तिच्यासोबत तिचे मित्रही गाताना दिसत आहेत. अभिनेत्रीच्या आगामी ‘भेडिया’ चित्रपटाचा दिग्दर्शक अमर कौशिकही तिच्याशी सुरात सुर मिळवताना दिसत आहे. क्रितीने काल तिच्या इंस्टाग्राम हँडलवरून हा व्हिडिओ शेअर केला आहे. व्हिडिओमध्ये अभिनेत्री केशरी रंगाच्या ड्रेसमध्ये दिसत आहे.
व्हिडिओमध्ये अभिनेत्रीसोबत अमर कौशिक आणि संगीतकार बोर्स बे देखील दिसत आहेत. व्हिडिओ शेअर करताना, अभिनेत्रीने कॅप्शनमध्ये लिहिले की, “रात्र अशी जात आहेत… माझे मित्र अमर कौशिक आणि अतिशय प्रतिभावान बोर्स बे यांच्यासोबत गुणगुण करत.”
युजर्सने क्रितीच्या गायनाचे केले कौतुक
अभिनेत्रीच्या चाहत्यांनी व्हिडिओवर कमेंट करून प्रेमाचा वर्षाव केला आहे. एका युजरने लिहिले की, “किती सुंदर आवाज आहे.” दुसऱ्या युजरने लिहिले की, “क्रिती सेनन, व्वा खूप छान आवाज.” बहुतेक युजर्सनी कमेंट सेक्शनमध्ये फायर आणि हार्ट इमोजी शेअर करून आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. अभिनेता वरुण शर्मानेही एक सुंदर कमेंट केली आहे.
क्रिती सेनन-वरूण धवनचा ‘भेडिया’ २५ नोव्हेंबरला होणार आहे प्रदर्शित
क्रिती सेनन आणि वरुण धवन त्यांच्या आगामी ‘भेडिया’ चित्रपटातून प्रेक्षकांचे मनोरंजन करण्यासाठी सज्ज झाले आहेत. अमर कौशिक दिग्दर्शित हा एक हॉरर-कॉमेडी चित्रपट आहे. या चित्रपटात वरुण धवन आणि क्रिती सेनन मुख्य भूमिकेत आहेत. हा चित्रपट २५ नोव्हेंबर २०२२ रोजी चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे.
हेही वाचा –
- ‘अल्ला हू अकबर’ बोलणाऱ्या मुस्कानला आमिर खान-सलमान खान देणार ५ कोटी? जाणून घ्या सत्य
- जेव्हा राजकुमार यांनी डान्स करताना उडवली होती गोविंदाची मस्करी, पुढे झाले असे की…
- लता मंगेशकर यांच्या आठवणीने अभिनेते धर्मेंद्र झाले भावुक, म्हणाले ‘त्यांना एकटेपणापासून पळून…’