Monday, June 23, 2025
Home हॉलीवूड ‘डॉक्टर स्ट्रेंज’मध्ये परतला आयर्न मॅन ! आता टॉम क्रूझ साकारणार ‘ही’ मोठी भूमिका

‘डॉक्टर स्ट्रेंज’मध्ये परतला आयर्न मॅन ! आता टॉम क्रूझ साकारणार ‘ही’ मोठी भूमिका

‘अ‍ॅव्हेंजर्स एंडगेम’मधील आयर्न मॅनचे शहीद होणे हा चाहत्यांसाठी भावनिक क्षण होता. तेव्हापासून चाहत्यांकडून सतत अंदाज लावला जात होता की, आयर्न मॅन पुन्हा परत येईल की नाही? आयर्न मॅनची भूमिका करणाऱ्या रॉबर्ट डाउनी ज्युनियरने मार्व्हल स्टुडिओसोबतचा करार संपवला असला, तरी आयर्न मॅन परत येईल अशी चाहत्यांना अजूनही अपेक्षा होती.

आयर्न मॅन पुन्हा परतला
आता अखेर चाहत्यांच्या अपेक्षा पूर्ण करत, मार्वल स्टुडिओने ‘डॉक्टर स्ट्रेंज इन द मल्टीवर्स ऑफ मॅडनेस’मध्ये आयर्न मॅनला परत आणले आहे. यात एक छोटासा ट्विस्ट आहे की, हा आयर्न मॅन त्या आयर्न मॅनसारखा अजिबात नाही, ज्याचा विलक्षण मेंदू आणि हसवण्याची क्षमता खूप पसंत केली गेली.

 कथेत आहे एक मोठा ट्विस्ट
खरं तर, मार्वल स्टुडिओने टॉम क्रूझला (Tom Cruise) सुप्रीम आयर्न मॅनच्या अवतारात परत आणले आहे. ‘डॉक्‍टर स्ट्रेंज इन द मल्टीवर्स ऑफ मॅडनेस’ या चित्रपटाचा दुसरा ट्रेलर नुकताच प्रदर्शित झाला असून, निर्मात्यांनी आयर्न मॅन सुप्रीमची झलक दिली आहे. चाहत्यांनी ट्रेलर आणि कॉमिक बुकमधील काही फोटो इंटरनेटवर शेअर करण्यास सुरुवात केली आहे.

रॉबर्ट डाउनीचे चाहते झाले आहेत निराश
इतकेच नाही, तर सुप्रीम आयर्न मॅनच्या लूकमधील टॉम क्रूझचे काही फोटोही इंटरनेटवर आले आहेत, जे प्रचंड व्हायरल होत आहेत. फोटोंमध्ये तुम्ही टॉम क्रूझला आयर्न मॅनच्या भूमिकेत पाहू शकता. टॉम क्रूझला आयर्न मॅनच्या भूमिकेत पाहून चाहते आनंदित झाले आहेत. रॉबर्ट डाउनचे चाहते थोडे निराश झाले आहेत. कारण त्यांना रॉबर्ट परत येईल अशी अपेक्षा आहे.

टॉम क्रूझ त्याच्या सुपरहिट चित्रपटांमुळेच नाही, तर त्याच्या अफेअर्समुळेही चर्चेत असतो. टॉम क्रूझने ३ लग्ने केली आहेत. पण त्याच्या गर्लफ्रेंडची यादी मोठी आहे. टॉम क्रूझ त्याच्या ‘मिशन इम्पॉसिबल’ सीरिजसाठी भारतात खूप प्रसिद्ध आहे.

हेही वाचा –

हेही पाहा-

हे देखील वाचा