शिबानी दांडेकर आणि फरहान अख्तर लवकरच लग्न बंधनात अडकणार आहेत. दोघेही मागील अनेक दिवसापासून एकमेकांना डेट करत आहेत. त्या दोघांबद्दल अनेकवेळा बातम्या येत असत. ते दोघेही आधीच लग्न करणार होते, परंतु कोरोनामुळे त्यांचे लग्न होऊ शकले नाही. परंतु आता त्यांच्या लग्नाचे सगळे कार्यक्रम चालू झाले आहेत. त्यांच्या हळदीच्या फंक्शनला सुरुवात झाली आहे. अशातच रिया चक्रवर्तीचा व्हिडिओ समोर आला आहे. ती फरहानच्या घरी आली आहे. त्याचे घर अगदी नवरीप्रमाणे सजवले आहे.
काही दिवसातच ते लग्न बंधनात अडकणार आहेत. २१ फेब्रुवारी रोजी ते लग्न करणार आहे. हाती आलेल्या माहितीनुसार ते दोघेही १९ फेब्रुवारी रोजी महाराष्ट्रीयन पद्धतीने लग्न करणार आहेत. रिया त्यांच्या घरी हळदीसाठी पोहचली आहे. रियाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. तिने खूप सुंदर ड्रेस परिधान केला आहे. या व्हिडिओमध्ये पॅपराजी तिला कॅमेरामध्ये स्पॉट करत आहेत. तसेच फरहानचे सगळे घर सजलेले दिसत आहे.
माध्यमातील वृत्तानुसार , ते दोघेही पारंपारिक पद्धतीने लग्न करणार आहेत. ते १९ फेब्रुवारी का खंडाळा मधील फार्म हाऊसवर लग्न करणार आहेत. त्यांच्या कुटुंबीयांना असे वाटत होते की, त्यांच्या लग्नाबाबत गुप्तता राहावी. परंतु त्यांच्या लग्नाबाबत मीडियामध्ये जोरदार चर्चा चालू आहे. त्यांना केवळ त्यांच्या नातेवाईकांना आमंत्रण द्यायचे होते.
त्या दोघांचे कुटुंब १८ फेब्रुवारी रोजी लग्नाच्या ठिकाणी जाणार आहेत. शिबानी आणि फरहान गेल्या ४ वर्षापासून एकमेकांना डेट करत आहेत. त्यांच्या लग्नामसाठी त्यांचे चाहते खूप उत्सुक आहेत.
हेही वाचा :










