×

Birth anniversary : असे काय झाले होते की, निम्मी ओळखल्या जात होत्या ‘अनकिस्ड गर्ल ऑफ इंडिया’

बॉलिवूड अभिनेत्री निम्मी यांनी एकेकाळी चित्रपटसृष्टी गाजवली आहे. त्यांच्या अभिनयाने आणि सौंदर्याने त्यांनी सगळ्यांना मोहित केले होते. त्यांचे खरे नाव नवाब बानो हे होते. त्यांना राज कपूर यांनी चित्रपटसृष्टीत आणले होते. त्यांचा जन्म १८ फेब्रुवारी १९३३ मध्ये आग्रा येथे झाला. निम्मी यांनी अनेक वर्ष बॉलिवूडमध्ये काम केले आहे. एक सुंदर अभिनेत्री म्हणून त्यांचे नाव नेहमीच चर्चेत राहिले आहे. परंतु त्यांनी त्यांच्या अभिनयाच्या जोरावर प्रेक्षकांच्या मनात स्थान निर्माण केले होते. त्यांनी राज कपूर यांच्या ‘बरसात’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते. अशातच शुक्रवारी (१८ फेब्रुवारी) ते त्यांची जयंती आहे. यानिमित्त जाणून घेऊया त्यांच्याबाबत खास किस्सा.

निम्मी यांचा ‘बरसात’ या चित्रपटातील अंदाज प्रेक्षकांना एवढा आवडला होता की, त्यांना मोस्ट पॉप्युलर अभिनेत्री म्हणून सगळे ओळखू लागले. त्या नेहमीच त्यांच्या मर्जीने चित्रपट निवडत असत. खूप काही विचार करून त्या चित्रपट निवडत होत्या. त्यांचा होकार ऐकण्यासाठी दिग्दर्शक वाट बघायचे. त्यावेळी चित्रपटात निम्मी असल्या म्हणजे चित्रपट सुपरहिट होणार असे सगळ्यांना वाटत होते. त्यांना राज कपूर आणि दिलीप कुमार यांसारख्या अनेक दिग्गज कलाकारांनी त्यावेळी साथ मिळाली. एकदा त्यांचे काही फोटो चांगलेच व्हायरल होते. त्यानंतर त्या चर्चेत आल्या होत्या. यानंतर सगळीकडे ‘द अनकिस्ड गर्ल ऑफ इंडिया’ म्हणून त्या सर्वत्र लोकप्रिय झाल्या. (Actress nimmi’s birth anniversary let’s know about her life)

निम्मी यांचा ‘आन’ हा चित्रपट भारतासोबत लंडनमध्ये देखील दाखवला गेला होता. लंडनमध्ये या चित्रपटाच्या प्रीमियरवेळी मेहबूब खान त्यांची पत्नी आणि निम्मी उपस्थित होते. तसेच अनेक विदेशी कलाकार देखील तिथे होते. यावेळी एरल लेजली थीमसन निम्मी यांच्या हाताला किस करण्यासाठी पुढे आला तेव्हा निम्मी मागे सरकला आणि म्हणाल्या की, “मी एक हिंदुस्थानी मुलगी आहे तुम्ही माझ्यासोबत हे नाही करू शकत.” त्यानंतर ही घटना खूपच वेगाने व्हायरल झाली.

निम्मी या एक अभिनेत्री असण्यासोबतच एक गायिका देखील होत्या. १९५१ मध्ये प्रदर्शित झाल्याने ‘बेदर्दी’ या चित्रपटात त्यांनी केवळ अभिनय नाही तर गाणे देखील गायले होते. त्यानंतर ‘कुंदन’, ‘उडन खटोला’, ‘भाई भाई और बसंत बहार’ या चित्रपटात त्यांनी काम केले. यानंतर त्या यशाच्या शिखरावर पोहचल्या होत्या.

हेही वाचा :

Latest Post