Friday, January 16, 2026
Home साऊथ सिनेमा लहानपणापासून धोनीसोबत फोटो घ्यायला तरसलाय ‘हा’ दिग्दर्शक, आता त्याच्याच चित्रपटात दिसणार माही!

लहानपणापासून धोनीसोबत फोटो घ्यायला तरसलाय ‘हा’ दिग्दर्शक, आता त्याच्याच चित्रपटात दिसणार माही!

भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार आणि दिग्गज खेळाडू महेंद्रसिंग धोनीच्या (MS Dhoni) लोकप्रियतेची अनेक उदाहरणे आपल्याला पाहायला मिळत असतात. आपल्या शांत स्वभावाने आणि अफलातून नेतृत्व कौशल्याने या खेळाडूने टीम इंडियाला यशाच्या शिखरावर नेऊन ठेवले. महेंद्रसिंग धोनीचे देशात अनेक चाहते आहेत. अगदी सुपरस्टार रजनीकांत पासून राजकारणातील अनेक नेते मंडळी या खेळाडूचे फॅन आहेत. आता एका आणखी एका तामिळ चित्रपट क्षेत्रातील दिग्गज दिग्दर्शकाने महेंद्रसिंग धोनी माझा आदर्श असल्याचे सांगत भावनिक पोस्ट शेअर केली आहे. कोण आहेत हे दिग्दर्शक चला जाणून घेऊ.

कॅप्टन कूल म्हणून प्रसिद्ध असलेला आणि आयपीएलमध्ये चेन्नई सुपर किंग्ज संघाकडून खेळणाऱ्या महेंद्रसिंग धोनीचे तामिळ चित्रपट क्षेत्रातही असंख्य चाहते आहेत. चेन्नई सुपर किंग्ज आणि धोनी या नावांनी आयपीएलमध्ये नेहमीच प्रसिद्धी मिळवली आहे. अगदी सुपरस्टार रजनीकांत पासून अनेकजण माहीच्या खेळावर फिदा आहेत. आता याच यादीत तामिळ चित्रपट क्षेत्रातील प्रसिद्ध दिग्दर्शक विग्नेश शिवन यांच्या नावाचा समावेश झाला आहे. नुकतीच महेंद्रसिंग धोनी आणि विग्नेश शिवन यांची भेट झाली. यावेळी या भेटीने भावूक झालेल्या विग्नेश शिवन यांनी भलीमोठी पोस्ट करत आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.

दिग्दर्शक विग्नेश शिवन यांनी महेंद्रसिंग धोनीसोबत हातात बुके घेतलेला एक फोटो आपल्या अधिकृत इंस्टाग्राम अकाऊंटवरुन शेअर केला आहे. या फोटोसोबत त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. ज्यामध्ये ते म्हणतात की, “एका मेसेजमध्ये मी माझ्या आदर्श व्यक्तिमत्त्वाला भेटून मनात आलेल्या भावना व्यक्त करू शकत नाही. माझा आदर्श, माझा हीरो असलेल्या माणसाला मी भेटलो आणि त्यालाच पुढे ऍक्शन म्हणत निर्देशित करण्यासाठी मी सज्ज झालो आहे. या क्षणी मला समजले की आयुष्य किती सुंदर असते. हा अनमोल क्षण माझ्या आयुष्यात आणल्याबद्दल मी या विश्वाचे आभार मानतो.”

महेंद्रसिंग धोनीच्या भेटीने आनंदी झालेले विग्नेश शिवन यांनी आणखी एक फोटो शेअर केला आहे ज्यामध्ये ते म्हणतात की, “माझी आई जेव्हा आयपीएल सामन्यांमध्ये खेळाडूंच्या सुरक्षा करण्याऱ्या पोलिस दलात अधिकारी होती. त्यामुळे मी सुद्धा आईसोबत अनेकांना भेटलो आहे. तेव्हा माझी फक्त एकच इच्छा असायची की, मी माझ्या आदर्श खेळाडूची झलक बघू शकेन. मलाही आयुष्यात अनेकदा अपयश आले. तेव्हा मी धोनीचा आदर्श घेत होतो. त्याच्यामुळेच मी नेतृत्व कौशल्य शिकलो. फक्त धोनीची झलक पाहायला मी तासनतास उभा राहत होतो. तेव्हापासुन मला त्यांच्यासोबत फोटो काढायचा होता आज शेवटी माझे स्वप्न पूर्ण झाले.”

या पोस्टमध्ये विग्नेश शिवन यांनी महेंद्रसिंग धोनीबद्दल व्यक्त केलेल्या भावना त्यांच्या धोनी प्रेमाची साक्ष देत आहेत.

हेही पाहा –

हे देखील वाचा