×

Shaakuntalam | समंथाच्या चित्रपटाचा पोस्टर रिलीझ; सौंदर्य असे, ‘परमसुंदरी’च जणू!

दाक्षिणात्य अभिनेत्री समंथा रुथ प्रभूच्या (Samantha Ruth Prabhu) ‘शाकुंतलम’ चित्रपटाची अनेक दिवसापासून चर्चा सुरू आहे. या चित्रपटात समंथा कोणती भूमिका साकारणार याबदद्ल तिच्या चाहत्यांना मोठी उत्सुकता लागली होती. आता समंथाच्या चाहत्यांची प्रतिक्षा संपली असून, या बहुचर्चित चित्रपटातील समंथाचा पहिला लूक समोर आला आहे. ज्यामध्ये समंथा खूपच मनमोहक दिसत आहेत.

अभिनेत्री समंथाच्या ‘शाकुंतलम’ चित्रपटाचा पहिला पोस्टर रिलीझ झाला आहे. हे पोस्टर समंथाने आपल्या सोशल मीडिया अकाउंटवरून शेअर केले आहे. हे पोस्टर खूपच आकर्षित दिसत आहे. पोस्टरमध्ये समंथाचा लूक खूपच मनमोहक वाटत आहे, ज्यामध्ये ती जंगलात असल्याचे दिसून येत आहे. तिच्या भोवताली अनेक पशुपक्षी आणि प्राणी दिसत आहेत. या फोटोत समंथाने पांढऱ्या रंगाचा ड्रेस घातला असून, त्यावर तिने फुलांचे दागिने घातले आहेत. या सुंदर निसर्गामुळे आणि मनमोहक सौंदर्यामुळे समंथा खूपच क्युट दिसत आहे. तिच्या शेजारी एक डेरा ठेवल्याचे सुद्धा यामध्ये पाहायला मिळत आहे.

View this post on Instagram

A post shared by Samantha (@samantharuthprabhuoffl)

हा पोस्टर शेअर करताना समंथा म्हणते की, “सादर करत आहे निसर्गावर प्रेम करणाऱ्या शाकुंतलम मधून शकुंतला.” समंथाच्या या फोटोवर तिचे चाहते जोरदार प्रतिक्रिया देताना दिसत आहेत. आणि यामधील तिच्या सौंदर्याचे आणि वेगळ्या लूकचे कौतुक करताना दिसत आहेत. या चित्रपटात समंथासोबत देव मोहनसुद्धा काम करताना दिसणार आहे. चित्रपटात सुपरस्टार अल्लू अर्जुनची मुलगी सुद्धा काम करताना दिसणार आहे. याआधी समंथा रूथ प्रभूच्या ‘पुष्पा’ चित्रपटातील ‘ओ अंटवा’ गाण्याने सगळीकडे धुमाकूळ घातला होता. या गाण्यावरील समंथाचा डान्स पाहून सगळेच फिदा झाले होते. हे गाणे आजही सोशल मीडियावर चर्चेत आहे. त्यामुळे या आगामी चित्रपटातील समंथाच्या अभिनयाची झलक पाहण्याची सर्वांना उत्सुकता लागली आहे.

हेही वाचा –

हेही पाहा-

Latest Post