×

The Kashmir Files | अखेर बहुप्रतीक्षित चित्रपटाचा ट्रेलर रिलीझ, कश्मिरी पंडितांच्या वेदनादायक कथा टाकणार हादरवून

‘द कश्मीर फाइल्स’ची आतुरतेने वाट पाहणाऱ्या प्रेक्षकांसाठी एक आनंदाची बातमी समोर आली आहे. या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला आहे. काश्मिरी पंडितांवर बनलेला हा चित्रपट पाहण्यासाठी प्रेक्षक उत्सुक आहेत. प्रेक्षकांच्या प्रतिक्षेला पूर्णविराम देत चित्रपटाच्या दिग्दर्शकाने चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित केला आहे. विवेक अग्निहोत्री (Vivek Angihotri) यांनी हा चित्रपट लिहिला असून, दिग्दर्शनही त्यांनीच केले आहे. या चित्रपटात तुम्हाला अनुपम खेर (Anupam Kher) आणि मिथुन चक्रवर्ती (Mithun Chakravarti) मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. ‘द काश्मीर फाइल्स’ची सुरुवात काश्मीरच्या बंडखोरीमुळे १९९०च्या दशकात काश्मिरी पंडितांच्या पलायनाच्या वेदनापासून होते.

View this post on Instagram

A post shared by Vivek Ranjan Agnihotri (@vivekagnihotri)

माजी पंतप्रधान लाल बहादूर शास्त्री यांच्या मृत्यूमागील गूढ कथा ‘द ताश्कंद फाईल्स’ मध्ये सांगितल्यानंतर, दिग्दर्शक विवेक रंजन अग्निहोत्री सत्यकथेवर आधारित धक्कादायक चित्रपट घेऊन पुन्हा परतले आहेत. या चित्रपटात काश्मीरमध्ये १९९० च्या दशकात पसरलेली दहशत, गोंधळ आणि दहशत यांची झलक प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे.

या चित्रपटात काश्मिरी नरसंहाराचे वेदनादायक आणि भावनिक चित्र रेखाटण्यात आले आहे. चित्रपटाचे दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री यांनी सांगितले की, ही कथा पडद्यावर आणणे सोपे काम नव्हते. कारण काश्मिरी पंडितांचे पलायन हा भारतीय राजकारणातील महत्त्वाचा आणि संवेदनशील मुद्दा आहे. त्यामुळे हा चित्रपट प्रेक्षकांचे डोळे उघडण्याचे काम करणार आहे. त्यांनी सांगितले की, चित्रपटादरम्यान त्यातील सर्व कलाकारांनी आपापली पात्रे जगली आहेत.

View this post on Instagram

A post shared by Vivek Ranjan Agnihotri (@vivekagnihotri)

या चित्रपटात राष्ट्रीय पुरस्कार विजेती पल्लवी जोशी (Pallavi Joshi), अनुपम खेर, मिथुन चक्रवर्ती, मृणाल कुलकर्णी (Mrunal Kulkarni), पुनीत इस्सार, अमन इक्बाल, दर्शन कुमार, भाषा सुंबली आदी कलाकार आहेत. ‘द काश्मीर फाइल्स’द्वारे प्रेक्षक पात्रांच्या भावना अनुभवू शकतात. हा चित्रपट ११ मार्चला चित्रपटगृहात प्रदर्शित होत आहे.

हेही वाचा :

हेही पाहा-

Latest Post